राज्यस्तरीय अवयवदान जनजागृती अभियानाचा शुभारंभ

 राज्यस्तरीय अवयवदान जनजागृती अभियानाचा शुभारंभ

छ.संभाजीनगर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अवयवदान श्रेष्ठदान आहे, आपण मृत्यूनंतर आपले अवयवदान करून अनेकांचे प्राण वाचवू शकतो, ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान हाच एक आशेचा किरण असतो. अवयवदानाची चळवळ व्यापक होण्यासाठी सर्वांनी याबाबत जनजागृती करणे महत्वाचे असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी आज सांगितले.

राज्यस्तरीय ‘अवयवदान जनजागृती अभियान’ चे उद्घाटन त्यांच्या हस्ते शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथे पार पडले. यावेळी केंद्रीय वित्तमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सह संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. संजय राठोड आदी उपस्थित होते.

महाजन म्हणाले की, पाश्चिमात्य देशात 10 हजार लोकसंख्येमागे अवयवदान करणाऱ्यांची संख्या 3500 आहे तर हेच प्रमाण आपल्या देशात केवळ 1 आहे. त्यामुळे याबाबत जनजागृती आवश्यक आहे. आपल्या समाजात अवयवदानाविषयी म्हणावी तेवढी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुवर्ष प्रतिक्षेत आहेत. अवयवदान हे केवळ डोळे आणि किडनी पुरते मर्यादित नसून शरीरातील विविध अवयव आपण दान करु शकतो. पण यासाठी आवश्यक आहे ती पुरेशी माहिती आणि इच्छाशक्ती.

आपण केलेल्या अवयवदानामुळे अनेकांना जीवदान मिळू शकते. म्हणून याबाबत जागृती होणे आवश्यक आहे. राज्यस्तरीय ‘अवयवदान जनजागृती अभियान’ चे उद्घाटन झालेले आहे. आता ह्या चळवळीला व्यापक करणे आपल्या सर्वांची जिम्मेदारी असल्याचेही ते म्हणाले. सध्या स्त्रीयांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे तर तरुणांमध्ये मुख कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये बचत गटातील महिलांमार्फत स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

तरुणांनी देखील व्यवसनापासून दूर राहून शरीर निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम करावा. घाटी रुग्णालयातील रिक्त पदांची देखील लवकरच पदभरती केली जाईल.

निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या समस्या प्राधान्याने सोडविणार. पैठण येथे 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले.

डॉ. कराड म्हणाले की, अवयवदान हे जगातील सर्व श्रेष्ठ दान आहे. आपल्या मृत्युनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयवदान केल्याने एक देह अनेक जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो. अवयवदान ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणालेLaunch of state level organ donation awareness campaign

ML/KA/PGB
7 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *