उद्यापासून CNG आणि PNG दर कमी होण्याची शक्यता

 उद्यापासून CNG आणि PNG दर कमी होण्याची शक्यता

नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी ) : केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या किमती निश्चित करण्याच्या नवीन सूत्राला मंजुरी दिली. गॅसची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भारतीय बास्केटशी जोडली आहे. या निर्णयानंतर उद्या 8 एप्रिलपासून सीएनजी आणि पीएनजी या दोन्हीच्या किमती कमी होऊ शकतात. त्यामुळे पीएनजीच्या किमतीत सुमारे 10% आणि सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 5 ते 6 रुपयांनी घट होण्याचा अंदाज आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, ‘देशांतर्गत नैसर्गिक वायूची किंमत आता आंतरराष्ट्रीय हब गॅसऐवजी आयातित क्रूडशी जोडली गेली आहे. गॅसची किंमत आता भारतीय क्रूड बास्केटच्या आंतरराष्ट्रीय किमतीच्या 10% असेल. दर महिन्याला यावर निर्णय घेतला जाईल. आता घरगुती नॅचरल गॅसची किंमत दर महिन्याला निश्चित होणार आहेत.

ठाकूर म्हणाले की, नवीन फॉर्म्युला ग्राहक आणि उत्पादक या दोघांच्या हिताचा समतोल साधेल. सध्या, नवीन घरगुती गॅस किंमत मार्गदर्शक तत्त्वे, 2014 नुसार गॅसच्या किमती निश्चित केल्या आहेत. किमतीतील बदल 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबर रोजी होतो.

SL/KA/SL

7 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *