पायाभूत सुविधांच्या उभारणीची भारत-चीनची स्पर्धा हिमालयाला धोक्यात टाकत आहे का?

 पायाभूत सुविधांच्या उभारणीची भारत-चीनची स्पर्धा हिमालयाला धोक्यात टाकत आहे का?

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जोशीमठ आणि त्याच्या आसपासच्या जमिनीला तडे गेले आहेत. त्यामुळे हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे शहर चर्चेत होतं. हे शहर का बुडतंय हा एक वादाचा विषय झाला आहे. वैज्ञानिकांच्या मते यापेक्षाही चिंताजनक परिस्थिती हिमालय पर्वताची आहे. भारत आणि चीन तिथे ज्या वेगाने पायाभूत सुविधांचं निर्माण करत आहे. त्यामुळे निसर्गाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.

त्यांच्या मते तापमानवाढीमुळे हे क्षेत्र आणखीच अस्थिर होत आहे. कारण वाढत्या तापमानामुळे ग्लेशिअर (हिमनदी) आणि पर्माफ्रॉस्ट (अतिशीत प्रदेशातील गोठलेल्या मातीचा थर) दोन्ही वितळत आहेत. याच ठिकाणी नवीन महामार्ग, रेल्वे रुळ तयार केले जात आहे. सुरुंग खोदले जात आहे. इतकंच नाही तर हिमालयाच्या दोन्ही बाजूला बंदरं आणि विमानतळं बांधली जात आहेत. ओस्लो विद्यापीठाच्या भौतिक भूगोल आणि जलविज्ञान या विषयाचे प्राध्यापक अँड्रियास काब म्हणतात, “थोडक्यात सांगायचं तर आपण खूप मोठा धोका पत्करतो आहोत.”Is the India-China competition to build infrastructure endangering the Himalayas?

अँड्रियास यांनी 2021 मध्ये उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यातील एका हिमस्खलनाच्या कारणांचा एक अहवाल तयार केला होता. त्याचं सह लेखन अँड्रियास यांनी केलं आहे. या अहवालात व्यक्तिगत घटनांवर लक्ष केंद्रित केलं गेलं आहे मात्र या घटनांकडे आपण एकत्रितपणे पाहतो, तेव्हा या क्षेत्रातील वाढत्या धोक्याचा अंदाज येऊ शकतो. 3500 किमी पर्यंत पसरलेल्या या क्षेत्रात भारत आणि चीन एकत्र आहेत. दोन्ही देशाच्या मध्ये एक सीमा आहे त्याला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा असंही म्हणतात.

ML/KA/PGB
16 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *