रियल-टाइम व्यवहारांमध्ये पहिल्या दहा देशांमध्ये भारत अव्वल स्थानी

 रियल-टाइम व्यवहारांमध्ये पहिल्या दहा देशांमध्ये भारत अव्वल स्थानी

मुंबई, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संपूर्ण जगातील पहिल्या 10 देशांमधील रिअल-टाइम पेमेंट व्यवहारांमध्ये (real time payment transactions) भारत (India) अव्वल स्थानावर आहे. 2020 मध्ये भारतातील (India) व्यवहारांचे प्रमाण 15.6 टक्के होते. धनादेश आणि अन्य बिगर-डिजिटल व्यवहारांचा वाटा 61.4 टक्के होता. तर चीन (china) दुसर्‍या क्रमांकावर आहे. अमेरिकेसारखा (US) विकसित देश या प्रकरणात 9 व्या क्रमांकावर आहे. जपान (Japan) सातव्या क्रमांकावर आहे.

भारतात 2,574 कोटी व्यवहार
2,574 crore transactions in India

आकडेवारीनुसार 2020 मध्ये भारतात 2,574 कोटी रिअल टाईम व्यवहार झाले. त्याच वेळी चीनमध्ये 1,574 कोटी व्यवहार झाले. दक्षिण कोरिया तिसर्‍या क्रमांकावर असून त्याठिकाणी 601 कोटी व्यवहार झाले, तर थायलंड चौथ्या क्रमांकावर आहे. त्याठिकाणी 524 कोटी व्यवहार झाले. ब्रिटन 282 कोटी व्यवहारांसह पाचव्या क्रमांकावर आहे. तर नायजेरिया 191 कोटी व्यवहारांसह सहाव्या क्रमांकावर आहे.

जपान सातव्या क्रमांकावर
Japan ranked seventh

आकडेवारीनुसार जपान सातव्या क्रमांकावर आहे. जपानमध्ये एकूण 167 कोटी व्यवहार झाले. ब्राझील आठव्या क्रमांकावर आहे. 2020 मध्ये त्याठिकाणी एकूण 133 कोटी व्यवहार झाले. तर अमेरिकेत फक्त 121 कोटी व्यवहार झाले आणि तो 9 व्या क्रमांकावर आहे. मेक्सिको दहाव्या क्रमांकावर आहे ज्याठिकाणी 94 कोटी व्यवहार नोंदले गेले आहेत.

लोकसंख्येमुळे अधिक व्यवहार
More transactions due to population

भारतात लोकसंख्येमुळे व्यवहार खूपच जास्त असतात. विशेषत: डिजिटल होत असलेल्या लोकांमुळे रिअल टाइममध्ये होणारे व्यवहार लवकर होत असतात. म्हणजेच जर तुम्ही कोणतेही व्यवहार डिजिटल म्हणजेच नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग द्वारे केले असतील तर ते रिअल टाइम व्यवहारांमध्ये येतात. भारतात सन 2020 मध्ये अशाप्रकारचे एकंदर 25 अब्जाहून अधिक व्यवहार करण्यात आले. म्हणजेच, 130 कोटी लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे 20 टक्के लोकसंख्येइतके हे व्यवहार झाले होते.

डिजिटल पेमेंटचा वाटा 71.7 टक्के होईल
The share of digital payments will be 71.7 per cent

भारताबाबत असा अंदाज व्यक्त होत आहे की 2025 पर्यंत याठिकाणी एकूण पेमेंटमधील डिजिटल पेमेंटचा वाटा 71.7 टक्के होईल. तर रोख आणि धनादेशाचा वाटा सुमारे 28.3 टक्के असेल. अमेरिकेच्या एसीआय वर्ल्डवाइडच्या एका अहवालानुसार, 2020 मध्ये भारतातील व्यवहारांचे प्रमाण 15.6 टक्के होते. तर 22.9 टक्के तात्काळ पेमेंटचे आणि इतर इलेक्ट्रॉनिक पेमेटचे आहे. कागदावर आधारित पेमेंट म्हणजे धनादेश आणि इतर पेमेंटचा हिस्सा 61.4 टक्के होता.
अहवालानुसार, 2025 पर्यंत तात्काळ पेमेंटचे प्रमाण आणि इतर इलेक्ट्रॉनिक पेमेंटचे प्रमाण अनुक्रमे 37.1 आणि 34.6 टक्के असू शकते. 2024 पर्यंत, रियल-टाइम पेमेंटचे प्रमाण एकूण इलेक्ट्रॉनिक व्यवहाराच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे.
In 2020, the share of transactions in India was 15.6 per cent. The share of checks and other non-digital transactions was 61.4 per cent. India tops the list of top 10 real-time payment transactions in the world. China is in second place. Developed countries like the US rank 9th in this regard. Japan is ranked seventh.
PL/KA/PL/15 MAY 2021

mmc

Related post