निर्यात बनणार जीडीपी वाढीचे इंजिन

 निर्यात बनणार जीडीपी वाढीचे इंजिन

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्षात (2021-22) भारत निर्यातीत नवीन विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. निर्यात, सकल देशांतर्गत उत्पादनाच्या विकासाचे इंजिन बनण्यासाठी देखील सज्ज आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या (एप्रिल ते जून, 2021) जीडीपी वाढीमध्ये (GDP growth) निर्यातीचे (Export) योगदान 40 टक्के होते. आर्थिक वर्ष 2019-20 च्या पहिल्या तिमाहीत, वैयक्तिक खर्चावर 20,24,421 कोटी रुपये खर्च करण्यात आले, तर या वर्षी एप्रिल ते जूनमध्ये हा खर्च 17,83,611 कोटी रुपये होता. त्याचबरोबर या वर्षी एप्रिल ते जूनमध्ये 7,68,589 कोटी रुपयांची निर्यात झाली, तर आर्थिक वर्ष 2019-20 च्या याच कालावधीत 7,06,991 कोटी रुपयांची निर्यात झाली.
तज्ज्ञांच्या मते, ज्या पद्धतीने जागतिक वातावरण तयार होत आहे आणि निर्यात वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, ते पाहता निर्यातीकडे (Export) जीडीपी वाढीचे (GDP growth) इंजिन म्हणून नक्कीच पहाता येईल. चालू आर्थिक वर्षासाठी, केवळ वस्तुंच्या निर्यातीसाठी 400 अब्ज डॉलरचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे आणि एप्रिल ते ऑगस्टमध्ये 41 टक्के लक्ष्य साध्य झाले आहे.
 

भारत निर्यात बाजारात इतर देशांना मागे टाकू शकतो
India can overtake other countries in the export market

एचडीएफसी बँकेच्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञ साक्षी गुप्ता यांच्या मते सध्या भारताला जागतिक बाजारपेठेत आपला वाटा वाढवण्याची चांगली संधी आहे. ऑगस्टमध्ये, कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे, आशियातील इतर देशांच्या निर्यातीवर (Export) लक्षणीय परिणाम झाला, परंतु भारताच्या निर्यातीत वाढ दिसून आली. पुरवठा साखळी, लॉजिस्टिक समस्या आणि मालवाहतूक शुल्क यासारख्या समस्या सोडवून भारत आता निर्यात बाजारात इतर देशांना मागे टाकू शकतो. जागतिक निर्यातीत भारताचा वाटा दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. अमेरिका आणि युरोप सावरत असल्याने आणि तेथून चांगली मागणी येत असल्याने भारतीय निर्यातीची वाढ या गतीने सुरू राहू शकते, असे गुप्ता यांचे मत आहे.
 

उच्च मूल्य उत्पादनांची निर्यातही वाढत आहे
Export of high value products are also on the rise

तज्ज्ञांच्या मते, प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (PLI) योजना आणि इतर प्रोत्साहन पॅकेजमुळे भारत अनेक उच्च मूल्य उत्पादनांच्या निर्यातीत वेगाने पुढे जाऊ शकतो. हाय-एंड इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्यातीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय, मोबाईल फोन, फार्मा, मशिनरी यासारख्या उच्च मूल्य उत्पादनांची निर्यातही वाढत आहे.

देशांतर्गत खप हेच विकासाचे प्राथमिक इंजिन
Domestic consumption is the primary engine of development

तज्ञांचे म्हणणे आहे की साधारणपणे असे दिसून येते की जेव्हा निर्यातीची वाढ कमी असते तेव्हा जीडीपी वाढीचा (GDP growth) दरही कमी असतो. तथापि, काही तज्ञ अजूनही देशांतर्गत खपालाच विकासाचे मुख्य साधन म्हणून पाहतात. स्टेटट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार एस के घोष यांच्या मते, देशांतर्गत खप हेच विकासाचे प्राथमिक इंजिन असेल आणि त्याच्या वाढीशिवाय उच्च आणि शाश्वत विकास दर साध्य करणे कठीण आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल. तज्ञ असेही म्हणत आहेत की निर्यातीत एवढी मोठी वाढ होण्यामागे वस्तूंच्या किंमती वाढणे देखील कारणीभूत आहे.
In the current financial year (2021-22), India is set to set a new record in exports. Exports are also poised to become the engine of GDP growth. In the first quarter of the current financial year (April to June, 2021), exports accounted for 40 per cent of GDP growth.
PL/KA/PL/15 SEPT 2021
 

mmc

Related post