आयकर विवरणपत्र दाखल करण्याची मूदत वाढणार ?

 आयकर विवरणपत्र दाखल करण्याची मूदत वाढणार ?

नवी दिल्ली, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आयकर विवरणपत्रे (income tax returns) भरण्याची शेवटची तारीख (Deadline), 31 डिसेंबरला फक्त काही दिवसच उरले आहेत. ही तारीख दोनदा वाढवण्यात आली, पण आकडेवारी पाहता ती पुन्हा एकदा वाढवावी लागेल, असे वाटत आहे. 26 डिसेंबरपर्यंत 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या 4.51 कोटींच्या पुढे गेली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी एकूण 5.95 कोटी विवरणपत्रे सादर करण्यात आली होती. अशा परिस्थितीत ही तारीख पुन्हा एकदा वाढवली जाऊ शकते, असे काही कर तज्ज्ञांचे मत आहे.

आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, 26 डिसेंबरपर्यंत भरलेल्या आयकर विवरणपत्रांपैकी (income tax returns) 2.44 कोटी विवरणपत्रे आयटीआर-1 अर्ज (सहज) आहेत, तर 1.12 कोटी विवरणपत्रे आयटीआर-4 फॉर्म (सुगम) आहेत. सहज आणि सुगम फॉर्म लहान आणि मध्यम करदात्यांच्या विवरणपत्रांसाठी वापरले जातात. सहज फॉर्म 50 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या वैयक्तिक करदात्यांना वापरता येतात. पगार आणि निवासी मालमत्तेद्वारे उत्पन्न कमावणार्‍या करदात्यांना सहज अर्ज भरायचा असतो. दुसरीकडे, सुगम अर्जाद्वारे, वैयक्तिक करदाते, हिंदू अविभक्त कुटुंबे आणि 50 लाख रुपयांपर्यंत व्यावसायिक उत्पन्न असलेले प्राप्तिकर विवरणपत्र सादर करु शकतात.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फारच कमी लोकांनी आयकर विवरणपत्रे भरली आहेत. 26 डिसेंबर 2021 पर्यंत फक्त 4.51 कोटी आयकर विवरणपत्रे (income tax returns) दाखल झाली आहेत. म्हणजेच सुमारे 1.44 कोटी आयकर विवरणपत्रे अद्याप दाखल व्हायची आहेत. गेल्या 10 दिवसांत सुमारे 1 कोटी लोकांनी आयकर विवरणपत्रे दाखल केली आहेत. आकडेवारी पाहता अवघ्या 5 दिवसांत सुमारे 1.5 कोटी आयकर विवरणपत्रे दाखल होतील असे वाटत नाही. अशा परिस्थितीत, आयकर विवरणपत्रे दाखल करण्याची अंतिम तारीख (Deadline) वाढणे निश्चित असल्याचे मानले जाते.

असे मानले जाते की जर फक्त 5 दिवसात सुमारे 1.44 कोटी आयकर विवरणपत्रे दाखल केली गेली तर संकेतस्थळावर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत लोकांना आयकर विवरणपत्रे भरण्यात अडचणी येऊ शकतात. नवे आयकर संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर अनेक महिने त्यात अनियमिततेच्या तक्रारी येत होत्या आणि अजूनही अधूनमधून काही ना काही तक्रारी येत आहेत. अशा परिस्थितीत, यावेळी देखील आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख (Deadline) वाढवून ती 10 जानेवारीपर्यंत केली जाण्याची शक्यता आहे.

The deadline for filing income tax returns is December 31, with only a few days left. This date has been extended twice, but given the statistics, it seems that it will have to be extended once again. As on December 26, the number of people filing income tax returns for the financial year 2020-21 has crossed 4.51 crore.

PL/KA/PL/28 DEC 2021

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *