परदेशातून मिळालेला निधी घोषित करण्याची मूदत वाढली

 परदेशातून मिळालेला निधी घोषित करण्याची मूदत वाढली

नवी दिल्ली, दि.6 (एमएमसी नूज नेटवर्क): प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) परदेशातून पाठविल्या जाणार्‍या निधींच्या प्रकरणात हाताने विवरणपत्र दाखल करण्याची मूदत 15 जुलैपर्यंत वाढवली आहे. प्राप्तिकर विभागाचे नवीन पोर्टल 7 जूनला सुरु झाल्यानंतर त्याचा वापर करणार्‍या अनेक लोकांनी त्यात येणार्‍या तांत्रिक अडचणीबद्दल तक्रार केली होती.
त्यानंतर, प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) परदेशी निधी संबंधी भरण्यात येणारे अर्ज 15 सीए, 15 सीबी बँकांमध्ये 30 जूनपर्यंत भरण्यास परवानगी दिली होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एका निवेदनात म्हटले आहे की आता असा निर्णय घेण्यात आला आहे की ही मूदत 15 जुलै 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

अधिकृत डिलरनाही सल्ला
Advice to authorized dealers

सीबीडीटीने म्हटले आहे की, हे लक्षात घेऊन करदाता आता हे अर्ज हाताने भरून 15 जुलै 2021 पर्यंत अधिकृत डिलरकडे दाखल करु शकतात. आयकर कायदा 1961 अंतर्गत 15 सीए अंतर्गत 15 सीबी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरायचे असतात. सध्या करदाते 15सीए अर्ज ज्याठिकाणी आवश्यक आहे, 15सीबी अर्जासोबत चार्टर्ड अकाउंटंटच्या प्रमाणपत्रांसह अधिकृत डीलरला प्रत देण्यापूर्वी ई-फाइलिंग पोर्टलवर अपलोड करतात. सीबीडीटीने अधिकृत डिलरनाही परदेशी निधी संबंधी 15 जुलैपर्यंत मॅन्युअल अर्ज स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे.
 
The Income Tax Department has extended the deadline for filing returns by hand till July 15 in case of remittances. After the new portal of the Income Tax Department was launched on June 7, many people who used it complained about the technical difficulties encountered in it.
PL/KA/PL/6 JULY 2021

mmc

Related post