केंद्र सरकारने आयकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत वाढवली

 केंद्र सरकारने आयकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत वाढवली

नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारने वैयक्तिक आयकर विवरणपत्र (Income Tax Return) दाखल करण्यासंदर्भात मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त कंपन्यांसाठी देखील आयकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) (CBDT) कंपन्यांनाही आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत दिली आहे.
आयकर कायद्यानुसार ज्या वैयक्तिक खात्यांचे लेखापरिक्षण (Audit) करण्याची गरज नसते ते सर्वसाधारणपणे आयटीआर -1 आणि आयटीआर -4 अर्ज दाखल करतात अशा लोकांसाठी 31 जुलै ही अंतिम मुदत असते आणि त्याव्यतिरिक्त ज्या कंपन्यांच्या खात्यांचे लेक्षापरिक्षण करावे लागते त्यांची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर असते.

साथीमुळे करदात्यांना दिलासा
Consolation to taxpayers due to the pandemic

सीबीडीटीने (CBDT) जारी केलेल्या परिपत्रकानुसार कोरोना साथीमुळे (corona pandemic) करदात्यांना होत असलेल्या समस्यांपासून दिलासा देण्यासाठी मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीडीटीने मालकांकडून कर्मचार्‍यांना फॉर्म 16 देण्याची अंतिम मुदत देखील एक महिन्याने वाढवून 15 जुलै 2021 केली आहे. त्याशिवाय कर लेखापरिक्षण अहवाल दाखल करण्याची मुदत देखील एका महिन्याने वाढवून 31 ऑक्टोबर आणि ट्रांसफर प्राइसिंग सर्टिफिकेट दाखल करण्याची मुदत एक महिन्याने वाढवून 31 नोव्हेंबर करण्यात आली आहे. विलंबाने किंवा सुधारित करविवरणपत्र (Income Tax Return) दाखल करण्याची मुदत 31 जानेवारी 2022 करण्यात आली आहे. वित्तीय संस्थांकरिता वित्तीय व्यवहारांचे निवेदन सादर करण्याची अंतिम मुदत 31 मे वरुन वाढवून ती 30 जून करण्यात आली आहे.

मूळ तारखेपर्यंतच कर विवरणपत्र दाखल करण्याचा सल्ला
Advise to file tax return till the original due date

नांगिया अँड कं एलएलपीचे भागीदार शैलेश कुमार यांचे म्हणणे आहे की अंतीम मुदतीत वाढ झाल्याने करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु ज्यांच्या संपूर्ण आयकर भरण्यावर टीडीएस (TDS) आणि आगाऊ कर (Advance Tax) भरला जात नाही आणि ही देणी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांनी वाढीव मुदतीच्या ऐवजी मूळ मुदतीपर्यंतच कर विवरणपत्र (Income Tax Return) दाखल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे केल्यामुळे त्यांना कलम 234 ए अंतर्गत कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. कारण मूळ मुदतीनंतर दरमहा 1 टक्के दराने शुल्क भरावे लागते.
 
The Central Government has given great relief in filing personal income tax returns. The deadline for filing income tax returns for the financial year 2020-21 has been extended by two months to September 30. In addition, the deadline for companies to file income tax returns has also been extended. The Central Board of Direct Taxes (CBDT) has also given companies a November 30 deadline to file income tax returns.
 
PL/KA/PL/21 MAY 2021
 

mmc

Related post