मालवणी दंगलीतील आरोपीच्या अटकपूर्व जामिनावर 6 एप्रिलला सुनावणी

 मालवणी दंगलीतील आरोपीच्या अटकपूर्व जामिनावर 6 एप्रिलला सुनावणी

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रामनवमीच्या दिवशी मालाड- मालवणी परिसरात उसळलेल्या दंगलीत सामील असलेल्या सामाजिक कार्यकर्ते जमील मर्चन्ट यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर 6 एप्रिलला सुनावणी होणार आहे.
आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी व्हिडीओ फुटेज न्यायालयात सादर केले, त्यावर न्यायालयाने अटकपूर्व जामिनावर सुनावणी 6 एप्रिल पर्यंत पुढे ढकली आहे. Hearing on pre-arrest bail of Malvani riots accused on April 6

30 एप्रिल रोजी मालवणी परिसरात रामनवमीची मिरवणूक मालवणी 5 नंबर सवेरा बिल्डिंगजवळून जात असताना, चप्पल, व दगड फेक झाल्यानंतर पोलिसांनी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते जमील मर्चंट यांच्या नावासह 18 नामांकित आणि 300 ते 400 अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला. जमील मर्चंटच्या म्हणण्यानुसार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्वत: त्यांना फोन करून प्रकरण शांत करण्याचा आग्रह केला, त्यानंतर त्यांनी लोकांना शांत होण्याचे आवाहन केले. मात्र दंगल भडकवण्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्यांचे नाव समोर आल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. माझ्याकडे सर्व फुटेज आहेत ज्यात दिसून येते की वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः जमावाला जबरदस्ती मशीद आणि सवेरा कंपाऊंडमध्ये आणत आहेत. प्रकरण मिटले तेव्हा माझे आभार मानणारे अधिकारी आणि प्रकरण पूर्णपणे शांत होताच मला या प्रकरणात गोवण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 25 हून अधिक जणांना अटक केली आहे, मात्र या प्रकरणात जमील मर्चंटने सर्व फुटेज कोर्टात ठेवले असून, त्या आधारे त्याच्या अटकपूर्व जामिनावर 6 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.असे ऍड मिलन देसाई यांनी सांगितले.

ML/KA/PGB
4 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *