राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय….

ठाणे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ठाण्याची ओळख शिवसेनेचे ठाणे अशी आहे, आता ती ओळख पुसून गुंडांचे ठाणे अशी झाली आहे, त्यातच राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला असल्याची टीका उध्दव ठाकरे यांनी केली आहे.
ठाण्यात ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या कार्यकर्ती वर काल शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने हल्ला केल्याच्या पार्श्वभूमी वर ठाण्यात बोलत होते.
आता महिलांची गँग होत्ये हे पहिल्यांदाच मी ऐकतोय ,
त्यांनी काहीही करावं आणि आम्ही ऐकू असं होणार नाही असा इशारा त्यांनी दिला , हल्ला झालेल्या कार्यकर्ती ची त्यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सह रुग्णालयात भेट घेतली. The state has got a good Home Minister.
जर शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर मग यांना मुळा पासून आम्ही उखडून टाकू,
ज्या गुंड महिलेने हल्ला केला आहे तीच्या विरोधात तक्रार नोंदवलीच नाही असे ते म्हणाले.
राज्याला एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे, केवळ उपमुख्यमंत्रीपद मिरवणे आणि चमकणे हेच ते करत आहेत अशी टीका उध्दव ठाकरे यांनी करत या फडतूस गृहमंत्र्याला पदावर बसण्याचा अधिकार नाही असे म्हटले.
स्वतःच्या घरात काही झालं की sit नेमायची असे सांगत हे गुंड मुख्यमंत्री आहेत का? गुंड मंत्री असं एक खातं आता त्यांनी या सरकार मध्ये सुरु केलं पाहिजे असे ते म्हणाले.
उगाच यात्रा काढायच्या,
पण ज्यांच्या विचाराने काढत आहेत त्यांच्या विचारांनी चला असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
ML/KA/PGB
4 Apr. 2023