…तर जागतिक आर्थिक सुधारणा मंदावणार
नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक ऊर्जेचा वापर करणारा देश भारताने जगाला इशारा दिला आहे की तेलाच्या किंमती (oil prices) अशाच प्रकारे महाग राहिल्या तर जागतिक आर्थिक सुधारणा (economic recovery) मंदावण्याचा धोका आहे. त्याचबरोबर भारताने सौदी अरेबिया आणि इतर तेल उत्पादक देशांना (ओपेक) किंमती कमी करण्यासाठी आणि पुरवठा विश्वासार्ह करण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले.
भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर मे महिन्यापासून उच्च पातळीवर गेले आहेत. सेरावीकच्या इंडिया एनर्जी फोरमला मार्गदर्शन करताना पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, इंधनाचे दर उच्च राहिले तर जगभरातील आर्थिक सुधारणा (economic recovery) कमी होतील.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, कोरोना साथी दरम्यान, जगातील बहुतेक देशांमध्ये लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे मागणी कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती (oil prices) 19 डॉलर प्रति बॅरलवर आल्या होत्या. संसर्गजन्य साथीच्या विरूद्ध जगभरात जलद लसीकरणामुळे या वर्षी तेलाची मागणी सुधारली, तेव्हा कच्चे तेल वाढून 84 डॉलर प्रति बॅरल वर गेले.
केंद्रीय मंत्री पुरी यांनी सांगितले की, यामुळे इंधन महाग झाले आणि महागाईची शक्यता वाढली. ते म्हणाले की जून 2020 च्या तिमाहीत भारताचे तेल आयात देयक 8.8 अब्ज डॉलर होते, जे या वर्षी वाढून 24 अब्ज डॉलर झाले आहे. याचे कारण जागतिक बाजारात तेल महाग होणे हे आहे. पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, भारताचे मत आहे की इंधनाची उपलब्धता विश्वसनीय, परवडणारी आणि स्थिर असावी. विनाशकारी साथीनंतर आर्थिक सुधारणा (economic recovery) कमकुवत झाली आहे आणि तेलाच्या उच्च किमतींमुळे त्याला आणखी धोका निर्माण झाला आहे.
भारत आपल्या गरजेच्या सुमारे दोन तृतीयांश तेल पश्चिम आशियातून आयात करतो. त्यामुळे त्याने तेल उत्पादक आणि निर्यात करणाऱ्या देशांना म्हणजेच ओपेक देशांना आवाहन केले आहे की तेलाच्या उच्च किंमतींमुळे पर्यायी इंधनाकडे वेगाने वाटचाल करावी लागेल आणि अशा परिस्थितीत हे उच्च दर उत्पादकांसाठीच हानिकारक ठरतील. पुरी म्हणाले की, अलीकडेच त्यांनी सौदी अरेबिया, युएई, कुवेत, कतार, अमेरिका, रशिया आणि बहारीन यांच्याकडे महाग इंधनाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
भारत आपल्या तेलाच्या गरजेच्या 85 टक्के आणि गॅसच्या गरजेच्या 55 टक्के आयात करतो. हा जगातील एकमेव देश आहे जिथे तेलाचा वापर सतत वाढत आहे. भारताशिवाय तेल उत्पादकांनाही फटका बसेल. त्यामुळे त्यांनी परस्पर हित लक्षात घेऊन तेलाची किंमत (oil prices) नियंत्रणात ठेवण्याची रणनीती आखली पाहिजे, जेणेकरून खप, किंमत आणि पुरवठ्याचे चांगले संतुलन राहील.
India, the world’s third-largest energy consumer, has warned the world that global economic recovery is in danger of slowing down if oil prices remain high. India also called on Saudi Arabia and other oil-producing countries (OPEC) to take steps to reduce prices and make supplies more reliable.
PL/KA/PL/21 OCT 2021