पेट्रोलियममंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले अर्थव्यवस्था……

 पेट्रोलियममंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले अर्थव्यवस्था……

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (diesel) वाढत्या किंमती दरम्यान, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी (HardeepSingh Puri) यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की देशाची अर्थव्यवस्था (economy) पुन्हा रुळावर येत आहे. पेट्रोलचा खप कोविड- पूर्व पातळीच्या तुलनेत 16 टक्के आणि डिझेलचा खप 10 ते 12 टक्के जास्त आहे. 2024-25 पर्यंत भारत 5000 अब्ज अमेरिकन डॉलर आणि 2030 पर्यंत 10,000 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या काही महिन्यांत पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (diesel) वाढत्या किमतींवर हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की इंधनाचे दर जास्त आहेत. अशा प्रकारच्या वाढत्या किमती जागतिक आर्थिक सुधारणांना कमकुवत करतआहेत आणि विकसनशील देशांच्या हितांना हानी पोहोचवत आहेत. हरदीपसिंग पुरी पुढे म्हणाले की, ही परिस्थिती कमी करण्यासाठी ते अमेरिका आणि सौदी अरेबिया सारख्या देशांशी चर्चा करत आहेत. केंद्रीय मंत्री असेही म्हणाले की आर्थिक सुधारणांसह, ऊर्जेचा वापर देखील वाढेल.
पेट्रोलियम मंत्र्यांच्या मते, तेलाची मागणी आणि ओपेक आणि त्याच्या सहयोगी देशांसारख्या (ओपेक प्लस) उत्पादकांकडून होत असलेला पुरवठा यामध्ये फरक आहे. भारत मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आयातीवर अवलंबून आहे. तो 85 टक्के कच्चे तेल आयात करतो. त्याच वेळी, तो आपल्या गॅस वापराच्या 55 टक्के आयात करतो.
पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (diesel) किरकोळ किमती जवळपास दररोज नवा विक्रम बनवत आहेत. 28 सप्टेंबरपासून दिल्लीत पेट्रोल 5.35 रुपये आणि डिझेल 6.65 रुपयांनी महाग झाले आहे. सध्या दिल्लीत पेट्रोल 106.54 रुपये आणि डिझेल 95.27 रुपयांनी विकले जात आहे.
हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) म्हणाले की भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) देखील वेगाने वाढत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 20.1 टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे, जे व्यावसायिक घडामोडींमध्ये एक मजबूत सुधारणा दर्शवते. त्यांनी शेअर बाजारातील विक्रमी तेजीचाही उल्लेख केला. पुरी म्हणाले की, शेअर बाजार हा विकासाचा आणखी एक मापदंड आहे. बीएसई सेन्सेक्सने मंगळवारी प्रथमच 62,000 चा आकडा ओलांडला.
 
Amid rising petrol and diesel prices, Petroleum Minister Hardeep Singh Puri has made an important statement. He said the country’s economy was getting back on track. Consumption of petrol is 16 per cent higher than that of Covid-East and diesel consumption is 10 to 12 per cent higher. He expressed confidence that India would become an economy of US 000 5000 billion by 2024-25 and US 10,000 10,000 billion by 2030.
PL/KA/PL/22 OCT 2021
 

mmc

Related post