चंद्रपूरातील वाघांची नसबंदी करण्याचा वनविभागाचा निर्णय

 चंद्रपूरातील वाघांची नसबंदी करण्याचा वनविभागाचा निर्णय

चंद्रपूर, दि. २७ : वाघांच्या वाढत्या संख्येमुळे मानवी आणि पशुधनावरील हल्ले रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव वनविभागाने केंद्र सरकारकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे. देशात पहिल्यांदाच वाघांच्या नसबंदीचा प्रयोग करण्याची तयारी वनिवभागाकडून येत आहे. वाघांच्या वाढत्या संख्येमुळे मानवी आणि पशुधनावरील हल्ले रोखण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांची वाढती संख्या आणि वाघांच्या हल्ल्यांमध्ये माणसांसह पाळीव प्राण्यांचे जाणारे बळी लक्षात घेता आता वाघांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाने मोठे पाऊल उचलले आहे. वाघांची नसबंदी करण्यासाठी वनविभागाने केंद्र सरकारकडे विशेष परवानगी मागितली असून, अशी मागणी करणारा चंद्रपूर हा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्याच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी आज मुल तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेत चंद्रपूर वनविभागाच्या मुख्यालयावर धडक दिली. वाघांच्या संख्येवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासह विविध मागण्या त्यांनी यावेळी केल्या. यावर उत्तर देताना चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांनी वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केल्याची महत्त्वपूर्ण माहिती दिली.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *