ताजमहालाच्या संगमरवरी तुकड्याचा ब्रिटनमध्ये लिलाव
लंडन, दि. २७ : जगातील सात आश्चर्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या आग्रा येथील ताजमहालाच्या फुलांची किनार असलेल्या संगमरवरच्या एसा स्लॅबचा पुढच्या महिन्यात लिलाव करण्यात येणार आहे. या आयताकृती स्लॅब त्या दोन स्लॅब पैकी आहे. ज्यांना कर्नल कर्नल पाउनोल फिप्स यांनी १८१६ मध्ये मिळवले होते. त्यावेळी ते आग्रा आणि आजूबाजूच्या इमारतीच्या डागडुजीच्या कामांचे अधिक्षक होते.
कर्नलच्या मुलाने लिहून ठेवलेले आहे की हे स्लॅब त्याच्या वडीलांना ताजमहालाच्या एका भूमिगत तळघरातून मिळाले होते. त्यावेळी त्यांना वाटले होते की ही स्लॅब मुगलकालीन या ऐतिहासिक स्मारकाच्या डागडुजीच्या कामासाठी होती. कर्नल पॉनोल फिप्स यांचा जन्म १७८० मध्ये इंग्लंडच्या डेवोनमध्ये झाला होता. १७ व्या शतकाच्या सुरुवातीपासून त्यांच्या कुटुंबातील लोक सैनिक राहिले आहे. या परंपरेला पुढे वाढवत १७९९ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगाल सैन्यात कॅडेट म्हणून ते सामील झाले. इजिप्तच्या सैन्यासोबत युद्धानंतर फिप्स भारतात परतले.
या स्लॅबसाठी २० हजार ते ३० हजार पाऊंड ( सुमारे २४ – ३६ लाख भारतीय रुपये ) पर्यंत बोली लावली जाण्याचा अंदाज आहे. या ९ डिसेंबरला ल्योन एंड टर्नबुल ऑक्शन हाऊसद्वारा आयोजित इस्लामिक आणि भारतीय कलाच्या लिलावात सादर केले जाणा आहे. लिलावाशी संबंधित दस्ताएवजानुसार या संगमरवरी स्लॅब सोबत ताजमहालची एक जुनी ब्लॅक एंड व्हाईट फोटो आणि दोन पत्रे देखील आहेत. यातील एक कर्नल पाऊनोलच्या नातवाने छापले होते. आणि दुसरे मार्क्विस ऑफ बाथद्वाराने हाताने लिहिलेले होते.
SL/ML/SL