त्यांच्या अडीच वर्षाच्या कारभारानंतर कळलंच फडतूस कोण ते

नागपूर, दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): उद्धव ठाकरे यांनी आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर केलेल्या जहाल टिकेनंतर फडणवीस यांनीही ठाकरे यांना कडक इशारा दिला आहे. ठाण्यामध्ये ठाकरे गटाच्या शिवसेना महिला कार्यकर्तीला मारहाण करण्यात आली आहे. रोशनी शिंदे या महिला कार्यकर्तीला मारहाण झाल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांना भेटण्यासाठी आले होते. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.ठाण्यामध्ये ठाकरे गटाच्या शिवसेना महिला कार्यकर्तीला मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे, अत्यंत लाचार आणि लाळघोटपणा करणारा उपमुख्यमंत्रिपद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्रिपद मिरवत आहे. केवळ उपमुख्यमंत्रिपद मिरवलं आणि चमकायचं हेच ते करत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला, तरी हे काही करत नाही, फडतूस गृहमंत्र्याला पदावर बसण्याचा अधिकार नाही. स्वतःच्या घरात काही झालं की एसआयटी नेमायची, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.उद्धव ठाकरे यांच्या या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे. नेमकं फडतूस कोण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, मी नागपूरचा आहे त्यामुळे मला यापेक्षाही खालच्या भाषेत बोलता येतं, पण मी तसं करणार नाही. अडीच वर्ष मुख्यमंत्री राहून कसं सरकार चालवलं संपूर्ण राज्याला माहीत आहे. सचिन वाजे सारख्या माणसाला पोलीस दलात घेऊन काय काय धंदे केले हे सुद्धा सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे माझं तोंड उघडायला लावू नका, मी जर तोंड उघडलं तर पळता भुई थोडी होईल. मी तुमच्या उपकाराने राज्याचा गृहमंत्री नाही. मी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री आहे आणि सरकार पूर्ण होईपर्यंत राहणार आहे, अशी टीका फडणवाीस यांनी केली.

ML/KA/PGB 4 APR 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *