दूध संकलन केंद्रावर प्रमाणित मिल्कोमीटर वापरणे बंधनकारक

 दूध संकलन केंद्रावर प्रमाणित मिल्कोमीटर वापरणे बंधनकारक

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): दूध संकलन केंद्रांवर फॅट व एस.एन.एफ. मोजताना मिल्कोमीटर यंत्राचे चुकीचे सेटिंग करून शेतकऱ्यांची लूट केली जाते. वजन करतानाही शेतकऱ्यांना कमी वजन दाखवून लुटले जाते.या विरोधात किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दूध केंद्रावर मिल्कोमिट लावण्याची मागणी केली होती. अखेर मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. यापुढे दूध संकलन केंद्रांवर प्रमाणित केलेले मिल्कोमीटर वापरावे लागतील व वजन काटे आणि मिल्कोमीटर यांचे शासकीय यंत्रणेमार्फत नियमित प्रमाणीकरण व तपासणी केली जाणार आहे.

दूध संकलन केंद्रांवर प्रमाणित केलेले मिल्कोमीटर वापरावे लागतील व वजन काटे आणि मिल्कोमीटर यांचे शासकीय यंत्रणेमार्फत नियमित प्रमाणीकरण व तपासणी केली जाईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.तसेच वजन काटे वैधता प्रमाणीकरण विभाग व अन्न व पुरवठा विभाग या दोन शासकीय विभागांना याबाबतची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूटीला लगाम लागणार आहे.

अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने या निर्णयाचे अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ. अजित नवले यांनी स्वागत केले.

दूध संकलन केंद्रावरील मिल्कोमीटर व वजन काटे हे सरकारी यंत्रणेच्या मार्फत तपासले पाहिजेत व यासाठी स्वतंत्र निरीक्षकाची नियुक्ती केली पाहिजे, अशी मागणी सातत्याने किसान सभेने लावून धरली होती. त्याचा पाठपुरावाही सातत्याने राज्य सरकारकडे केला जात होता.

नाशिक ते मुंबई दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने मोर्चा काढला होता. या लॉंग मार्चमध्ये सुद्धा ही मागणी घेण्यात आलेली होती.

SL/KA/SL

4 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *