कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने मे महिन्यात जोडले 9.20 लाख सदस्य

 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने मे महिन्यात जोडले 9.20 लाख सदस्य

नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) (EPFO) मे 2021 मध्ये एकूण 9.20 लाख सदस्य (members) जोडले आहेत. याचा अर्थ असा होतो की कोविड-19 (covid-19) साथीच्या दुसर्‍या लाटेचा खुपच कमी परिणाम झाला आहे. 20 जुलैला ईपीएफओने जाहीर केलेल्या प्रोव्हिजन पेरोल आकडेवारीनुसार, ईपीएफओने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत आपली एकूण सदस्यता 20.20 लाखांनी वाढवली आहे.
पेरोल आकडेवारीमधून जे संकेत प्राप्त झाले आहेत त्यानुसार पेरोल विस्तारावर साथीच्या (covid-19) दुसर्‍या लाटेचा परिणाम पहिल्या लाटे इतका तीव्र झाला नाही. याचे श्रेय ईपीएफओद्वारे (EPFO) ऑनलाईन दावे जमा करणे, ऑटो-क्लेम सेटलमेंट, भविष्य़ निर्वाह निधी खात्याची ऑनलाईन ट्रान्सफर, तक्रार निवारण आणि मोबाईलवरील सेवा इत्यादींच्या रूपात भारत सरकारच्या नियमित पाठिंब्याला देता येईल.

5.37 लाख नवीन सदस्य प्रथमच जोडले गेले
5.37 lakh new members were added for the first time

मे महिन्यात जोडल्या गेलेल्या एकूण 9.20 लाख सदस्यांपैकी सुमारे 5.73 लाख नवीन सदस्य (members) पहिल्यांदाच कर्मचाररी भविष्य निर्वाह निधी योजनेच्या कक्षेत आले आहेत. त्याच वेळी सुमारे 3.47 सभासद त्यातून वेगळे झाले, परंतु नोकरीतील बदलासह ते पुन्हा ईपीएफओच्या (EPFO) अखत्यारित येणार्‍या संस्थांशी जोडले गेले आणि त्यांनी निधी हस्तांतरणाद्वारे या योजनेत त्यांचे सदस्यत्व कायम ठेवले आहे.

22 ते 25 वर्षे वयोगटात सर्वाधिक नोंदणी
The highest enrollment is in the age group of 22 to 25 years

पेरोल आकडेवारीची वयोगटानुसार तुलना केली तर मे 2021 मध्ये 2.39 लाख नवीन सदस्यांसह (members) 22 ते 25 वर्षे वयोगटातील सर्वाधिक लोकांनी नोंदणी केली. तर 29 ते 35 वयोगटातील लोकांची संख्या 1.90 लाख होती. या काळात जोडले गेलेल्या एकूण नवीन सदस्यांमध्ये महिलांचा वाटा सुमारे 21.77 टक्के होता.

5 राज्यांनी 11.83 लाख सभासद जोडले
5 states added 11.83 lakh members

आकडेवारीनुसार, महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमधील नोंदणीकृत आस्थापना या महिन्यात सुमारे 5.45 लाख नवीन सदस्यांसह आघाडिवर राहील्या. सर्व वयोगटातील एकूण पेरोल विस्तारांपैकी त्यांचा वाटा जवळपास 59.29 टक्के होता. या आर्थिक वर्षात या 5 राज्यांनी आतापर्यंत 20.20 लाख सदस्यांपैकी 11.83 लाख सभासदांची (members) भर घातली आहे. ईपीएफओ (EPFO) मे, 2018 पासून पेरोल आकडेवारी जाहीर करत आहे, ज्यात सप्टेंबर 2017 पर्यंतची आकडेवारी समाविष्ट केली जाते.
The Employees Provident Fund Organization (EPFO) has added a total of 9.20 lakh members in May 2021. This means that the second wave of the Covid-19 pandemic has had very little effect. According to the provisional payroll figures released by the EPFO on July 20, the EPFO has increased its total membership by 20.20 lakh in the first two months of this financial year.
PL/KA/PL/21 JULY 2021

mmc

Related post