एक ऑगस्टपासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार

 एक ऑगस्टपासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अलीकडे बँकांकडून एटीएम (ATM) व्यवहारासाठी घेण्यात येणार्‍या इंटरचेंज शुल्कामध्ये (interchange fee) वाढ करण्याची घोषणा केली होती. आर्थिक व्यवहारावरील इंटरचेंज शुल्क 15 रुपयांवरून 17 रुपये करण्यात आले आहे. त्याचबरोबर, बिगर-आर्थिक व्यवहारासाठीचे शुल्क 5 रुपयांवरून 6 रुपये करण्यात आले आहेत. हे नवीन दर 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होतील.

इंटरचेंज शुल्क म्हणजे काय
What is an interchange fee?

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मते, इंटरचेंज शुल्क (interchange fee) असे शुल्क आहे जे बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे देयकाची प्रक्रिया करण्यासाठी मर्चंटकडून घेत असते.

एटीएममधून रोकड काढण्याच्या नियमात बदल
Changes in the rules for withdrawing cash from ATMs

रिझर्व्ह बँकेने (RBI) म्हटले आहे की ग्राहक त्यांच्या बँकेच्या एटीएममधून (ATM) पाच विनामूल्य व्यवहार करू शकतात. यामध्ये आर्थिक आणि बिगर-आर्थिक व्यवहारांचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर ग्राहक इतर बँकेच्या एटीएममधूनही कोणत्याही शुल्काशिवाय पैसे काढू शकतात. याअंतर्गत मेट्रो शहरांमध्ये अन्य बँक एटीएममधून (ATM) तीन आणि मेट्रो नसलेल्या शहरांमध्ये पाच व्यवहारांचा समावेश आहे.

1 जानेवारी 2022 पासून शुल्कामध्ये होणार बदल
Fees will change from 1 January 2022

रिझर्व्ह बँकेने (RBI) निश्चित केलेल्या नि:शुल्क व्यवहारापेक्षा जास्त व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना 1 जानेवारी 2022 पासून 21 रुपये शुल्क द्यावे लागेल. सध्या हे शुल्क 20 रुपये आहे. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले होते की, जास्त इंटरचेंज शुल्काची (interchange fee) भरपाई करण्यासाठी आणि सर्वसाधारण खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन त्यांना ग्राहक शुल्कामध्ये वाढ करुन प्रति व्यवहार 21 रुपये करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे बदल 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील.

रिझर्व्ह बँकेबद्दल महत्वाच्या गोष्टी
Important things about the RBI

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही देशातील बँकिंग प्रणालीची नियामक आहे. केंद्रीय बँक देशाची अर्थव्यवस्था, बँकांची स्थिती आणि बँकिंग प्रणालीच्या कामकाजाचा आढावा घेते. त्याचबरोबर दर दोन महिन्यांनी चलनविषयक दराचा आढावाही रिझर्व्ह बँकेकडून घेतला जातो. शक्तीकांतदास भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर आहेत.
The Reserve Bank of India (RBI) had recently announced an increase in the exchange charges charged by banks for ATM transactions. The interchange fee on financial transactions has been increased from Rs 15 to Rs 17. Also, charges for non-financial transactions have been increased from Rs 5 to Rs 6. These new rates will be effective from 1 August 2021.
PL/KA/PL/22 JULY 2021
 

mmc

Related post