केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरुन वरून 28 टक्के

 केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरुन वरून 28 टक्के

मुंबई, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाढती महागाई आणि कोरोना साथीच्या दरम्यान मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांचा (central employees) महागाई भत्ता (Dearness Allowance) 17 टक्क्यांवरून 28 टक्के केला आहे. त्याचा लाभ 1 जुलै 2021 पासूनच मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (सीसीईए) बुधवारी या निर्णयाला मान्यता दिली. सरकारच्या या निर्णयाचा 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 61 लाख निवृत्तीवेतनाधारकांना फायदा होईल. यासाठी सरकार सुमारे 34,401 कोटी रुपये खर्च करणार आहे.
याआधी कोरोना साथीमुळे जून 2021 पर्यंत कर्मचारी (central employees) व निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता वाढवण्यावर स्थगिती देण्यात आली होती. अशा परिस्थितीत या निर्णयाचा त्यांना फायदा होणार आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्त्याचे 3 हप्ते मिळायचे शिल्लक आहेत. हे हप्ते 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 रोजी देण्यात येणार होते.

महागाई भत्ता म्हणजे काय?
What Is Dearness allowance ?

महागाई भत्ता (Dearness Allowance) हा पगाराचा एक भाग असतो. कर्मचार्‍याच्या मुळ पगाराची एक निश्चित टक्केवारी असते. देशातील महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी सरकार आपल्या कर्मचार्‍यांना (central employees) महागाई भत्ता देते. तो वेळोवेळी वाढवण्यात येतो. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनाही त्याचा फायदा होतो.

महागाई भत्यामुळे पगार कसा बदलतो
How Dearness allowance changes salary

यासाठी पगार पुढे दिलेल्या कोष्टकात भरा.
(मुळ वेतन + ग्रेड पे) × महागाई भत्ता टक्केवारी = महागाई भत्त्याची रक्कम
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मुळ वेतनामध्ये ग्रेड पगार जोडल्यानंतर जो पगार होतो त्याला महागाई भत्त्याच्या टक्केवारीने गुणल्यावर जे उत्तर येते त्याला महागाई भत्ता (Dearness Allowance) म्हणतात. उदाहराणार्थ समजा आपले मुळ वेतन 10 हजार रुपये आहे आणि ग्रेड वेतन 1000 रुपये आहे. दोघांची भर घालून एकूण 11 हजार रुपये झाले. आता वाढलेल्या 28 टक्के महागाई भत्याच्या दृष्टीने पाहीले तर तो 3080 रुपये होतो. म्हणजेच सर्व रक्कम जोडून आपला एकूण पगार 14,080 रुपये होतो. 17 टक्के महागाई भत्ता असताना 12,870 रुपये मिळणारा पगार आता महागाई भत्त्यात 11 टक्क्यांची वाढ होऊन 28 टक्के झाल्यामुळे दरमहा 1210 रुपये नफा होतो.

जूनमध्ये घाऊक महागाई दर 12.07 टक्के
Wholesale inflation stood at 12.07 per cent in June

बुधवारी सरकारने जूनमधील घाऊक महागाईची (Wholesale inflation) आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार जूनमध्ये घाऊक किंमत निर्देशांक (WPI) घसरून 12.07 टक्क्यांवर आला जो मे महिन्यात सलग पाचव्या महिन्यात विक्रमी 12.94 टक्के झाला होता. जून 2020 मध्ये घाऊक महागाई दर 1.81 टक्के होता. वाणिज्य आणि उद्योगाच्या मते, जूनमध्ये घाऊक महागाई दर 12 टक्क्यांहून अधिक होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे खनिज तेल महाग होणे. यात पेट्रोल, डिझेल, नाफ्त्यासह जेट इंधनाचा समावेश आहे. याशिवाय मुळ धातू, खाद्यपदार्थ यासारख्या उत्पादित उत्पादनांच्या किंमतीही वाढल्या आहेत.
In the midst of rising inflation and the Corona pandemic, the Modi government has given a big gift to central employees. The government has increased the dearness allowance for central employees from 17 per cent to 28 per cent. It will be available from July 1, 2021. The Cabinet Committee on Economic Affairs (CCEA) on Wednesday approved the decision.
PL/KA/PL/15 JULY 2021
 

mmc

Related post