महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेस २३ जुलै पर्यंत मुदतवाढ द्यावी, राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला प्रस्ताव

 महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेस २३ जुलै पर्यंत मुदतवाढ द्यावी, राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला प्रस्ताव

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजने Prime Minister’s Crop Insurance Scheme मध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने आज केंद्र शासनाकडे पाठविल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे Agriculture Minister Dadaji Bhuse यांनी दिली आहे .
पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याचा आज (१५ जुलै) शेवटची मुदत असून आतापर्यंत सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. मात्र राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना प्रतिबंधासाठी corona prevention असलेले निर्बंध यामुळे शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता यावे यासाठी सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने २३ जुलै July 23 पर्यंत योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव आज राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठविला आहे. the state government sent a proposal to the Center
ML/KA/PGB
15 july 2021

mmc

Related post