केंद्रीय कर्मचार्‍यांच्या घरभाडे भत्यामध्येही वाढ

 केंद्रीय कर्मचार्‍यांच्या घरभाडे भत्यामध्येही वाढ

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या दीड वर्षांपासून असलेली महागाई भत्त्यावरील (DA) स्थगिती हटवण्यात आल्यानंतर केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी (central employees) आता आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. सरकारने आता केंद्रीय कर्मचार्‍यांच्या घरभाडे भत्त्यातही (HRA) बदल केला आहे. कर्मचार्‍यांना आता ऑगस्टच्या पगारामध्ये घरभाडे भत्ताही वाढवून मिळणार आहे. सरकारच्या आदेशानुसार, महागाई भत्ता 25 टक्क्यांहून अधिक झाला असल्यामुळे घरभाडे भत्ता वाढवण्यात आला आहे.

घरभाडे भत्ता वाढवून 27 टक्के झाला
The HRA increased to 27 per cent

केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्‍यांचा (central employees) महागाई भत्ता (DA) 17 टक्क्यांवरुन वाढवून 28 टक्के केला आहे, या घोषणेनंतर केंद्र सरकारने घरभाडे भत्ता (HRA) देखील वाढवून 27 टक्के केला आहे. वास्तविक खर्च विभागाने 7 जुलै 2017 रोजी एक आदेश जारी केला होता ज्यामध्ये असे म्हटले होते की जेव्हा महागाई भत्ता 25 टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त होईल तेव्हा घरभाडे भत्त्त्यामध्ये सुधारणा केली जाईल. 1 जुलैपासून महागाई भत्ता (DA) 28 टक्के झाला आहे, म्हणूनच घरभाडे भत्त्यामध्येही सुधारणा करणे आवश्यक आहे.

शहरानुसार घरभाडे भत्ता वेगवेगळा
HRA vary by city

अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार केंद्रीय कर्मचार्‍यांना (central employees) त्यांच्या शहराच्या आधारे घरभाडे भत्ता (HRA) मिळणार आहे. शहरांची एक्स, वाय आणि झेड अशा तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सुधारणेनंतर एक्स श्रेणी शहरांसाठी घरभाडे भत्ता मुळ वेतनाच्या 27 टक्के असेल, त्याचप्रमाणे वाय श्रेणी शहरांसाठी घरभाडे भत्ता मुळ वेतनाच्या 18 टक्के असेल तर झेड श्रेणी शहरांसाठी तो मुळ वेतनाच्या 9 टक्के असेल.
जर एखाद्या शहराची लोकसंख्या 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर ते शहर झेड श्रेणीमधून वाय श्रेणीमध्ये श्रेणीसुधारित होते. म्हणजेच त्याठिकाणी 9 टक्क्यांऐवजी 18 टक्के घरभाडे भत्ता मिळेल. ज्या शहराची लोकसंख्या 50 लाखाहून अधिक आहे, ते शहर एक्स श्रेणीमध्ये येते. तिन्ही श्रेणींसाठी किमान घरभाडे भत्ता (HRA) 5400, 3600 आणि 1800 रुपये असेल. खर्च विभागाच्या मते, जेव्हा महागाई भत्ता 50 टक्क्यांवर जाईल तेव्हा घरभाडे भत्ता एक्स, वाय आणि झेड शहरांसाठी 30 टक्के, 20 टक्के आणि 10 टक्के करण्यात येईल.
With the lifting of the moratorium on dearness allowance for the last one and a half years, there is good news for the central employees. The government has also changed the house rent allowance for central employees. Employees will now get an increase in their housing allowance in August salary. As per the government order, the housing allowance has been increased as the inflation allowance has gone up by more than 25 per cent.
PL/KA/PL/19 JULY 2021

mmc

Related post