केंद्रीय कर्मचार्‍यांना पॅनल बाहेरील रुग्णालयातील उपचारांवरही मिळणार मेडिक्लेम

 केंद्रीय कर्मचार्‍यांना पॅनल बाहेरील रुग्णालयातील उपचारांवरही मिळणार मेडिक्लेम

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी (Central Governement Workers) आणखी एक चांगली बातमी आहे. जर ते केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेचा (Central Government Health Scheme ) (सीजीएचएस) फायदा घेत असतील तर त्यांना पॅनल बाहेरील रुग्णालयातील उपचारांचाही दावा मिळणार आहे. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) असे म्हटले आहे की केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या (Pensioners) उपचारांची व्याप्ती मर्यादित असू शकत नाही. याचा अर्थ असा की केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक सीजीएचएस पॅनेलच्या बाहेरील रुग्णालयातही उपचार घेऊ शकतील.
केंद्र सरकारच्या एका सेवानिवृत्त कर्मचार्‍याने वैद्यकीय बिलाची भरपाई करण्याची मागणी केली होती परंतू सरकार मेडिक्लेम (Mediclaim) देण्यास नकार देत होती कारण सेवानिवृत्त कर्मचार्‍याने सीजीएचएस पॅनेलच्या बाहेर असलेल्या रुग्णालयात उपचार घेतले होते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की आपत्कालीन परिस्थितीत सीजीएचएस पॅनेलच्या बाहेर खासगी रुग्णालयातील उपचारासाठी मेडिक्लेम मिळाला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठा फायदा होणार आहे कारण गंभीर आजाराच्या परिस्थितीत अनेकवेळा रुग्णांना सीजीएचएस पॅनेलच्या बाहेर खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. या निर्णयामुळे पॅनेलच्या बाहेर उपचार घेण्यास भाग पडलेल्या आणखी अनेक लोकांना दिलासा मिळणार आहे.
सरकारने काही दिवसांपूर्वीच केंद्रीय कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना निवडक खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचारांची सुविधा दिली आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांची संख्या सुमारे 1.1 कोटी आहे. या योजनेमुळे त्यांना चांगले उपचार मिळू लागले आहेत.

योजना काय आहे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्रीय कर्मचार्‍याला एक सीजीएचएस कार्ड बनवावे लागेल. त्याद्वारे त्याला सरकारी रुग्णालयात मोफत उपचार मिळू शकतील. खासगी रुग्णालयांमध्ये केलेल्या उपचारांच्या शुल्कात सूट मिळेल.

कार्ड का आवश्यक आहे

यापूर्वी कर्मचार्‍यांना दवाखान्याच्या काऊंटरवरून क्रमांक घ्यावा लागत होता. सरकारने ही व्यवस्था बदलली आहे. कर्मचार्‍यांना देशातील कोणत्याही रुग्णालयात उपचार मिळावे म्हणून सीजीएचएस प्लास्टिक कार्ड देण्यात आले आहे.

कार्ड कसे बनेल

सीजीएचएस कार्ड मिळविण्यासाठी cghs.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल. तसेच काही कागदपत्रेही ऑनलाईन जमा करावी लागतील. येथे कार्ड नूतनीकरण करण्याचाही पर्याय आहे. ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर एक महिन्यानंतर आपले प्लास्टिक कार्ड तयार होऊन आपल्या घरी येईल.
PL/KA/PL/12 FEB 2021
 

mmc

Related post