केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार चांगली बातमी

 केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार चांगली बातमी

नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दीर्घकाळ महागाई भत्त्याची वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central employees) आणि निवृत्तीवेतन धारकांना 1 जुलैपासून 28 टक्के दराने महागाई भत्ता (dearness allowance) मिळण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्के केला आहे. दरम्यान, आता कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे की दिवाळीपूर्वी महागाई भत्ता आणखी 3 टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. असे झाल्यास एकूण महागाई भत्ता 31 टक्के होईल. म्हणजेच ही दिवाळी कर्मचाऱ्यांसाठी आणखी आनंदाची जाऊ शकते.

दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता
dearness allowance to increase before Diwali

कर्मचारी संघटनेने मागणी केली आहे की सरकारने लवकरच महागाई भत्त्यात (dearness allowance) 3 टक्के वाढ जाहीर करावी, जेणेकरून केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central employees) महागाईपासून थोडा दिलासा मिळेल. AICPI निर्देशांकाची आकडेवारी आली आहे. निर्देशांक 121.7 वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत, जून 2021 साठी महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढणे निश्चित आहे. जून 2021 चा निर्देशांक 1.1 अंकांनी वाढला आहे, त्यामुळे तो 121.7 वर गेला आहे.

महागाई भत्ता 31 टक्के होईल
The dearness allowance will be 31 per cent

त्यानुसार, महागाई भत्ता 31.18 टक्के होईल, परंतु, महागाई भत्त्याची (dearness allowance) गणना राऊंड फिगरमध्ये केली जाते. त्यामुळे तो 31 टक्के होईल. असा अंदाज व्यक्त होत आहे की जून 2021 साठीच्या महागाई भत्त्याची घोषणा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत जाहीर केला जाऊ शकतो. त्याच वेळी, तो सप्टेंबरच्या पगारामध्ये दिला जाऊ शकतो.

आता पगार किती वाढणार
How much will the salary increase now?

आता जूनचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढला तर एकूण महागाई भत्ता 31 टक्के होईल. 7 व्या वेतन आयोग मॅट्रिक्सनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central employees) स्तर-1 ची वेतन श्रेणी 18,000 ते 56900 रुपये आहे. आता 18,000 रुपयांच्या मूळ पगारावर 28 टक्के दराने, मासिक महागाई भत्ता 5040 रुपये आहे, 31 टक्क्यांनुसार तो 5580 रुपये होईल. त्यानुसार वार्षिक वेतनात 6480 रुपये वाढ होईल.
Central employees and retirees, who have been waiting for a long-term dearness allowance, have started getting inflation at 28 per cent from July 1. The central government has increased the dearness allowance from 17 per cent to 28 per cent. Meanwhile, now there is another good news for the employees that the dearness allowance is expected to increase by another 3 per cent before Diwali.
PL/KA/PL/04 OCT 2021

mmc

Related post