2023 पासून आर्थिक विकास 6.5 ते 7 टक्के होण्याची अपेक्षा – कृष्णमूर्ती सुब्रमण्यम
मुंबई, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविड-19 ने (covid-19) देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian economy) मोठा धक्का दिला आहे, परंतु आता अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर परतत आहे. देशात टाळेबंदी हटल्यानंतर परिस्थिती बदलत आहे. मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2023 पासून आर्थिक विकास (economic growth) 6.5 ते 7 टक्के होण्याची अपेक्षा आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा जास्त परिणाम होणार नाही
The second wave of the corona will not have much effect
एका आभासी कार्यक्रमा दरम्यान मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणाले की सातत्याने होत असलेली सुधारणा आणि कोविड-19 (covid-19) लसीकरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. आर्थिक वर्ष 2023 पासून अर्थव्यवस्थेमध्ये 6.5 ते 7 वाढ झाल्याचे पहायला मिळेल. कोरोनाच्या दुसर्या लाटेचा खुप जास्त परिणाम होणार नाही. गेल्या दीड वर्षात करण्यात आलेल्या आवश्यक सुधारणा पाहता असे म्हणता येईल की भारताचा आर्थिक विकास (economic growth) एका दशकातील उच्च पातळीवर जाईल.
सुधारणांमुळे विकासाला चालना मिळेल
Improvements will drive development
सुब्रमण्यम यांनी सांगितले की सरकारने कृषी, कामगार, पीएलआय योजना, एमएसएमई मध्ये बदल केले आहेत. याबरोबरच बॅड बॅंक तयार करणे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करणे यासारख्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. सरकारने केलेल्या सुधारणांमुळे विकासाला चालना मिळेल.
आरबीआय काय म्हणते
What the RBI says
भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या मते, या आर्थिक वर्षात एप्रिल ते जून दरम्यान जीडीपी विकास दर 9.5 टक्के होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, आर्थिक वर्ष 2021-22 मधील जीडीपी विकास दर (GDP growth rate) 10.5 टक्के होण्याची अपेक्षा आहे.
पतमानांकन संस्था इक्रा काय म्हणते
What the credit rating agency ICRA says
पतमानांकन संस्था इक्राच्या मते, पहिल्या तिमाहीत आर्थिक विकास (economic growth) 10 टक्के असू शकतो. एप्रिल ते जून या तिमाहीत विकास दर दुहेरी अंकात वाढण्याची शक्यता आहे. टाळेबंदीमुळे 2019-20 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपी विकास दर (GDP growth rate) 23.7 टक्क्यांनी घसरला आहे. यामुळे संपूर्ण आर्थिक वर्षासाठी 7.3% टक्क्यांची घट झाली.
Covid-19 has dealt a major blow to the country’s economy, but now the economy is slowly getting back on track. The situation is changing in the country after the lifting of the lockout. Chief Economic Adviser (CEA) Krishnamurthy Subramaniam said that economic growth is expected to be 6.5 to 7 per cent from FY 2023.
PL/KA/PL/17 JULY 2021