मूडीजने बदलले भारताचे मानांकन

 मूडीजने बदलले भारताचे मानांकन

नवी दिल्ली, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर भारतासाठी एक चांगली बातमी येत आहे. मूडीजने (Moody’s) भारताचे मानांकन ‘नकारात्मक’ बदलून ‘स्थिर’ केले आहे. त्याचबरोबर भारताचे बीएए 3 हे मानांकन कायम राहिले आहे. याआधी, मूडीजने मे महिन्यादरम्यान भारताचे मानांकन कमी करुन नकारात्मक बीएए3 केले होते. त्यावेळी मूडीजने म्हटले होते की, आर्थिक विकासाच्या (economic growth) मार्गातील अडथळे, उच्च कर्ज आणि कमकुवत आर्थिक व्यवस्था यांचा परिणाम सार्वभौम पत वर होतो.

आर्थिक विकास दर 13.7 टक्के राहण्याचा अंदाज
Economic growth is projected at 13.7 percent

अमेरिकेच्या पत मानांकन संस्था मूडीजने (Moody’s) फेब्रुवारीमध्ये भारताचा आर्थिक विकास (economic growth) दर 2021-22 साठी 13.7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. अधिकृत अंदाजानुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 8 टक्के घट झाली आहे.

भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर खूप दबाव
Too much pressure on India’s healthcare system

मूडीजने (Moody’s) म्हटले होते की, भारत कोविड-19 च्या दुस-या लाटेचा सामना करत आहे. जे नजिकच्या कालावधीतील आर्थिक सुधारणा मंद आणि दीर्घकालीन विकासाची गती कमी करू शकते. कोरोना संसर्गाच्या नवीन रुग्णामध्ये वाढ झाल्याने भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर खूप दबाव आला, ज्यामुळे रुग्णालयांना वैद्यकीय पुरवठा कमी झाला.
There is good news for India at the forefront of the economy. Moody’s has changed India’s rating from ‘negative’ to ‘stable’. At the same time, India’s BAA3 rating has been maintained. Earlier, Moody’s downgraded India to negative BAA3 during May. At the time, Moody’s said that obstacles to economic growth, high debt and a weak economy were affecting sovereign credit.
PL/KA/PL/06 OCT 2021
 

mmc

Related post