अठरा कंपन्या आणि बँकांच्या मानांकनात बदल

 अठरा कंपन्या आणि बँकांच्या मानांकनात बदल

नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पतमानांकन संस्था मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसेसने (Moody’s) बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, एसबीआय, अॅक्सिस बँकेसह देशातील 18 कॉर्पोरेट कंपन्या आणि बँकांच्या मानांकनात (rating) सुधारणा करुन ते ‘नकारात्मक’ वरून ‘स्थिर’ श्रेणीत आणले. याआधी मंगळवारी अमेरिकेच्या पतमानांकन संस्थेने भारताच्या दृष्टिकोनात बदल करत तो नकारात्मक वरून स्थिर केला. मूडीजने भारताला ‘बीएएए 3’ मानांकन दिले होते.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनला ‘नकारात्मक’ श्रेणीतच ठेवले
Bharat Petroleum Corporation was kept in the ‘negative’ category

मूडीजने (Moody’s) ज्या नऊ कंपन्यांचे मानांकन (rating) बदलले आहे त्यात रिलायन्स, टीसीएस, इन्फोसिस, ओएनजीसी, पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड, अल्ट्राटेक सीमेंट, ऑईल इंडिया, इंडियन ऑयल कॉरपोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) यांचा समावेश आहे. संस्थेने खासगीकरणासाठी सज्ज असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (बीपीसीएल) मानांकनाला दुजोरा देत त्याला ‘नकारात्मक’ श्रेणीतच ठेवले आहे.

मालमत्ता गुणवत्ता आणि भांडवली स्थैर्यामुळे बँकांच्या मानांकनात बदल
Changes in the rating of banks due to asset quality and capital stability

याव्यतिरिक्त, मूडीजने (Moody’s) एसबीआय, अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, पीएनबी, युनियन बँक आणि एक्झिम बँकेचे मानांकन बदलून नकारात्मक श्रेणीवरून स्थिर श्रेणीत केले. मालमत्ता गुणवत्ता आणि भांडवली स्थैर्यामुळे या कंपन्यांचे मानांकन (rating) सुधारण्यात आले आहे, असे मुडीजने म्हटले आहे.
तथापि, मूडीजने एनटीपीसी, एनएचएआय, पीजीसीआयएल, गेल, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) यांचा समावेश असलेल्या दहा पायाभूत कंपन्यांच्या स्थिर श्रेणीत बदल करुन ती नकारात्मक केली आहे.
Credit rating agency Moody’s Investors Services on Wednesday upgraded the ratings of 18 corporate companies and banks in the country, including Reliance Industries, Infosys, SBI and Axis Bank, from ‘negative’ to ‘stable’. Earlier on Tuesday, the US credit rating agency changed India’s stance to a negative one. Moody’s had rated India as ‘BAAA3’.
PL/KA/PL/ 07 0CT 2021

mmc

Related post