कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे मुडीज ने भारताचा विकास दराचा अंदाज केला कमी
नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पतमानांकन संस्था मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेसने (Moody’s) भारताच्या विकास दराचा (Growth rate) अंदाज कमी करून 9.6 टक्के केला आहे. याआधी मूडीजने 13.9 टक्के विकास दराचा अंदाज दिला होता. मूडीजने चालू वर्षासाठी 9.3 टक्क्यांच्या विकास दराचा अंदाज वर्तवला असला तरी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जीडीपी विकास दरात 7.3 टक्क्यांची घसरण पहाता वास्तविक विकास दर 2.3 टक्केच राहील. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये विकास दर 4 टक्के होता. तर आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत विकास दरात 23.9 टक्के घट झाली होती.
भारताची पत जोखीम वाढली
India’s credit risk increased
त्याआधी मूडीजने (Moody’s) 2020-21 या आर्थिक वर्षात 9.3 टक्क्यांच्या वाढीचा (Growth rate) अंदाज वर्तवला होता. परंतु कोरोनाच्या (corona) दुसर्या लाटेने भारताच्या पत प्रोफाइलचा धोका वाढवला आहे. मूडीजच्या ‘मॅक्रोइकॉनॉमिक्स-इंडिया’ नावाच्या अहवालात सांगण्यात आले आहे की कोरोनामुळे एप्रिल आणि मे महिन्यात लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे आर्थिक घडामोडींचा वेग थांबला होता. मूडीजच्या मते, ‘विषाणूच्या दुसर्या लाटेने अनिश्चितता निर्माण केली आहे. परंतू हे आर्थिक नुकसान केवळ एप्रिल ते जून या तिमाही दरम्यानच रहाण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कहर
The devastation of the second wave of the corona
मूडीजच्या (Moody’s) अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) 9.6 टक्के दराने वाढेल. त्याच वेळी, 2022 मध्ये ती 7 टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे. अहवालात असे म्हटले आहे की भारताचा विकास दर (Growth rate) मोठ्या प्रमाणात लसीकरणावर अवलंबून असेल. मूडीजने म्हटले आहे की जूनच्या तिसर्या आठवड्यापर्यंत भारत केवळ 16 टक्के लोकसंख्येलाच लस देऊ शकला होता. वर्षाच्या उत्तरार्धात अर्थव्यवस्थेत तेजी पाहायला मिळु शकते कारण लसीकरणाची गती वाढल्यामुळे आर्थिक घडामोडी देखील वेग घेतील. मूडीजच्या अहवालानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आलेल्या कोरोनाच्या (corona) लाटेमुळे नुकसान कमी झाले आहे, मात्र मध्यमवर्गीय आणि निम्न उत्पन्न गटाचे उत्पन्न घटले आहे.
Credit rating agency Moody’s Investors Services has downgraded India’s growth rate to 9.6 per cent. Earlier, Moody’s had projected a growth rate of 13.9 per cent. Although Moody’s has projected a growth rate of 9.3 per cent for the current year, the actual growth rate will remain at 2.3 per cent in 2020-21, given the 7.3 per cent decline in GDP growth.
PL/KA/PL/24 JUNE 2021