महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 369 कोटींचा निव्वळ नफा

 महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 369 कोटींचा निव्वळ नफा

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रराज्य सहकारी बँकेला 369 कोटींचा निव्वळ नफा झाला असून रिझर्व बँकेच्या सर्व निकषांचे पालन करण्यात बँक आघाडीवर असल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी मुंबईत बँकेच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की सन 2011 मध्ये आर्थिक अडचणीत असलेल्या राज्य बँकेवर रिझर्व बँकेच्या आदेशानुसार प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत कार्यरत असलेल्या प्रशासकांनी व्यावहारिक तत्वांवर बँकेचे संचालन केल्यानेच आज राज्य बँक सुस्थितीत आहे हे त्यांनी विशेष नमूद केले.Maharashtra State Co-operative Bank has a net profit of Rs 369 crore
राज्य बँकेने रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पूर्ण केले आहेत . “Well managed and Financially Sound Bank” या वर्गासाठी रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या निकषांपेक्षा बँकेची आर्थिक परिस्थिती जास्त सक्षम असल्याची माहिती त्यांनी दिली. बँकेच्या प्रगतीची आकडॆवारी मागील वर्षीच्या तुलनेत झालेली वाढ सांगताना ते म्हणाले
बँकेचं नक्त मूल्य रुपये 2703 कोटी असून त्यात या वर्षांत 421 कोटींची वाढ झाली आहे. एकूण व्यवहार रुपये 43603 कोटीचे झाले असून यात 1937 कोटींची वाढ झाली आहे , भाग भांडवल रुपये 619 कोटी झाले असून त्यात 41 कोटींची वाढ झाली आहे. बँकेचा निव्वळ नफा रुपये 369 कोटी झाल्याचं त्यांनी सांगितलं नफ्यात 44 कोटींची वाढ झाली आहे. प्रति कर्मचारी व्यवसाय रूपये 52 कोटी झाली आहे यात 9 कोटी ची वाढ झाली आहे . प्रति कर्मचारी व्यवसाय वाढ बँकेच्या इतिहासातील सर्वात जास्त वाढ आहे असं त्यानी नमूद केले.
The bank has been receiving the “A” class continuously for the last 8 years and has been paying a 10 percent dividend to its members for the last seven years. Also, the Chief Minister is giving Rs. 5 crores to the State Government every year. He said that as the district central co-operative banks in the state were facing financial difficulties, the bank had planned to provide loans to the farmers through various working societies under them. He believes that this is the first such scheme in India. Ajit Deshmukh, Managing Director of the Bank was present at the press conference on the occasion.
बँकेस गेली 8 वर्ष सतत “अ” वर्ग प्राप्त होत आहे व मागील सात वर्षांपासून बँक सभासदाना 10 टक्के लाभाऊंश देत आहे. तसेच राज्य शासनाला दरवर्षी रुपये 5 कोटींची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देत आहे. राज्यातील जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँका आर्थिक अडचणीत असल्याने त्यांचे अंतर्गत असणाऱ्या विविध कार्यकारी सोसायट्या मार्फत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणेची योजना बँकेने तयार केली असल्याची माहिती त्यांनी दिली. आशा प्रकारची योजना ही भारतातील पहिलीच योजना असल्याबाबत त्यांचे मत आहे. आशा विविध प्रकारे बँकेची होत असलेली प्रगती त्यांनी विषद केली या प्रसंगी बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर अजित देशमुख ही पत्रकार परिषदेस उपस्थित होते
The State Bank has met all the criteria of the Reserve Bank. He informed that the financial condition of the bank is more capable than the criteria laid down by the Reserve Bank for the category of “Well managed and Financially Sound Bank”. He said the bank’s growth figures were higher than last year The bank’s net worth stands at Rs 2,703 crore, an increase of Rs 421 crore this year. The total turnover was Rs 43603 crore, an increase of Rs 1937 crore, the share capital was Rs 619 crore, an increase of Rs 41 crore. The bank’s net profit stood at Rs 369 crore, an increase of Rs 44 crore, he said. The business per employee has gone up to Rs 52 crore, an increase of Rs 9 crore. Business growth per employee is the highest growth in the bank’s history, he said.
ML/KA/PGB
24 Jun 2021

mmc

Related post