भारताचा विकास दर डिसेंबरमध्ये घसरला

 भारताचा विकास दर डिसेंबरमध्ये घसरला

नवी दिल्ली, दि.01 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत भारताचा जीडीपी विकास दर (GDP Growth Rate) 5.4 टक्के होता. बाजाराच्या 5.9 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा तो कमी आहे. बरोबर एक वर्षापूर्वी, डिसेंबर 2021 च्या तिमाहीत, विकास दर 0.40 टक्के होता. विशेष म्हणजे, बार्कलेजने या तिमाहीसाठी विकास दराचा अंदाज 6.6 टक्के व्यक्त केला होता.

एसबीआय रिसर्चनेही चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबरचा विकास दर (GDP Growth Rate) 5.8 टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, जानेवारीमध्ये प्रमुख उद्योगांच्या वाढीचा वेग मंदावला होता. आठ प्रमुख क्षेत्रांचा विकास दर जानेवारीत 3.7 टक्के नोंदवला गेला तर डिसेंबरमध्ये तो 4.1 टक्के होता.

त्याचबरोबर लेखा महानियंत्रकांनी (CGA) सोमवारी ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत सरकारची वित्तीय तूट आर्थिक वर्ष 22 च्या उद्दिष्टाच्या 58.9 टक्के झाली आहे. अहवालात म्हटले आहे की वित्तीय तूट जानेवारी 2022 मध्ये 75,500 कोटी रुपयांवरून वाढून 1.8 लाख कोटी रुपये झाली आहे, जी सुधारित अंदाजाच्या 58.9 टक्के आहे.

PL/KA/PL/01 MAR 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *