निफ्टी 16,000 च्या उंबरठ्यावर.नकारात्मक बाबी पचवून बाजाराने नवीन विक्रमी शिखर गाठले

 निफ्टी 16,000 च्या उंबरठ्यावर.नकारात्मक बाबी पचवून बाजाराने नवीन विक्रमी शिखर गाठले

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात बाजाराने नवीन विक्रमाची नोंद केली. बाजारावरती फेडरल रिझर्व्हची कॉमेंट्री,डेल्टा विषाणूचा प्रभाव,रुपयातील चढउतार,कच्या तेलाचे (Crude oil) भाव,औदयोगिक उत्पादनाचे(IIP DATA) आकडे,ग्राहक किंमत निर्देशांक(Consumer Price Index),अमेरिकेतील महागाईचे आकडे तसेच तिमाही निकाल या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर दीर्घकाळाकरीताच गुंतवणूक करावी.

पहिल्याच दिवशी बाजाराने दिला सपाट बंद. Market Ends Near Flatline After A Rangebound Trading Session. 

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अमेरिकन बाजारातील रेकॉर्ड तेजीच्या आधारे भारतीय बाजाराची सुरुवात चांगली झाली. शुगर सेक्टरमध्ये तेजी होती MAWANA, SHREE RENUKA, BAJAJ HINDUSTAN  ह्या शेअर्सना ५टक्क्यांचे सर्किट(शेअर्सची दिवसभराची मर्यादा ) लागले (upper circuit).सिमेंट शेअर्स सुद्धा चांगलेच वाढले ULTRATECH, RAMCO, GRASIM हे शेअर्स २-३ टक्कयांनी वाढले.बांधकाम क्षेत्रातील SOBHA, DLF, GODREJ PROP, OBEROI REALTY हे शेअर्स चांगलेच वधारले . रुपयाची सुरुवात देखील मजबूत झाली.सकाळी फार्मा सेक्टर वगळता सगळ्या क्षेत्रात तेजीचे वातावरण होते. Bulls (तेजीवाल्यांचा ) पगडा बाजारात दिसत होता परंतु वरच्या स्तरावर बाजारात चांगलीच नफावसुली झाली. बाजार बंद होताना सपाट बंद झाला निफ्टीने  केवळ ३ अंक वाढून  १५,७०० चा बंद दिला व सेन्सेक्सने १४ अंकांची वाढ घेऊन ५२,३०० चा बंद दिला. Sensex, Nifty End On Flat Note; Mid- And Small-Cap Shares Outperform.

सोमवारी संध्याकाळी औदयोगिक उत्पादनाचे(IIP DATA) आकडे जाहीर झाले  मे महिन्यात त्यात वाढ झाली ग्रोथ २९. ३% राहिली. मागील वर्षाच्या तुलनेत हि वाढ दिसून येत आहे. सलग दुसऱ्या महिन्यात महागाईत वाढ झालेले दिसली सोमवारी संध्याकाळी जाहीर झालेला  ग्राहक किंमत निर्देशांक रिझर्व्ह बँकेच्या धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक म्हणजेच ६.२६ %इतका नोंदवला गेला. The retail inflation, measured Consumer Price Index (CPI) slightly eased to 6.26 per cent in June. Separately, the factory output, measured in terms of Index of Industrial Production (IIP), grew by 29.3 per cent in May.

१२ वर्षावरील मुलांकरिता लवकरच कोरोना प्रतिबंध लस येण्याची शक्यता आहे. झायडस -कॅडीला या कंपनीला या संबंधी परवानगी मिळू शकते व ऑगस्ट पासून लसीचा पुरवठा होण्याची चिन्हे आहेत. Nod for Zydus Cadila’s Covid Shot for Kids Over 12 Yrs May Take Few More Days, Supply to Start by Aug

 

तीन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात तेजी निफ्टीने १५,८०० चा टप्पा केला पार. Markets snapped their three-day losing streak and end higher

अमेरिकेत सोमवारी तिमाही निकालाच्या अगोदर DOW, S&P 500 आणि NASDAQ यांनी पुन्हा नवीन विक्रमी स्तर गाठला याच मजबूत संकेतांमुळे मंगळवारी भारतीय बाजाराची सुरुवात जोरदार झाली.३१ मे नंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी तेजी आली.मिडकॅप,स्मालकॅप इंडेक्सनी रेकॉर्ड बंद दिले.बँकिंग,फायनान्स,ऑटो,ह्या क्षेत्रातील शेअर्स वाढले.फार्मा ,मेटल,सिमेंट या क्षेत्रात देखील चांगली खरेदी झाली. दिल्ली येथे पावसाचे आगमन झाले,आगमन जरा उशिरा झाले परंतू पाऊस  लवकरच संपूर्ण उत्तर भारत व्यापून टाकेल अश्या बातम्यांमुळे फर्टीलायझर क्षेत्रातील शेअर्स वाढले.बाजारात तेजीवाल्यांचा दबदबा होता.HDFC TWINS, ICICI BANK, RIL या शेअर्सच्या जोरावर निफ्टीने १५,८००चा टप्पा पार केला.अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याकरिता BoE (बँक ऑफ इंग्लंड) ने एक मोठा निर्णय घेतला बँक डिव्हिडंड(Dividend) व डिव्हिडंड  पे-आऊट(PAYOUT) वरील निर्बंध हटवले.निफ्टीने १२०अंकांची वाढ घेऊन १५,८०० च्या वरती बंद देण्यात यश मिळवले तर सेन्सेक्सने ४०० अंकांची वाढ घेतली व ५२,७७० चा बंद दिला. Sensex, Nifty end almost a percent higher

आय.टी क्षेत्रातील खरेदीमुळे बाजारात पसरली तेजी. Sensex, Nifty end in the green, IT stocks steal the limelight.  

अमेरिकन मार्केट मंगळवारी खालच्या स्तरावर बंद झाले. जून महिन्याच्या महागाईच्या आकड्यांमुळे तेथील बाजारात दबाव होता. जून मध्ये महागाई ०.९% वाढल्याने १३ वर्षाच्या उच्चतम स्तरावरती पोहोचली. ‘Core Inflation’ वाढून २० वर्षाच्या उच्चतम स्तरावरती पोहोचले. महागाईमुळे बॉण्ड यील्ड सुद्धा वाढले.अमेरिकेत कच्च्या तेलाच्या साठ्यात घट झाल्याने ब्रेंट क्रूड प्रति डॉलर ७६ च्या वर पोहोचले.त्यामुळे आशियाई बाजाराची पर्यायाने भारतीय बाजाराची सुरुवात देखील कमजोर झाली.रुपयाची सुरुवात देखील नरमाईने झाली.भारतीय बाजारात खालच्या स्तरावरून खरेदी झाल्याने,खास करून आय.टी क्षेत्रात  निफ्टीने १५,८५० चा टप्पा ओलांडला.Infosys, TCS, HCL Tech आणि  Tech Mahindra या सारख्या आय.टी क्षेत्रातील शेअर्समुळे बाजारात तेजी पसरली. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण व पहिल्या तिमाहीत आय.टी क्षेत्र उत्तम कामगिरी करेल हा आशावाद यामुळे हे शेअर्स वाढले. L&T, Wipro आणि ITC या शेअर्स मधेही जोश होता.देशभरात हळूहळू पावसाने आपली व्याप्ती वाढवण्यास सुरुवात केल्याने बाजारावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. सेन्सेक्स १३४ अंकांची वाढ घेऊन ५२,९०४.०५ व निफ्टी ४२ अंकांची वाढ घेऊन १५,८५३. ९५  ह्या स्तरावर बंद झाले.Markets bucked the weak global trend and end with modest gains as investors were quick to purchase information technology (IT) stocks.

गुरुवारी बाजारात चांगलीच तेजी होती वाढती महागाई व अमेरिकन फेडची घोषणा या गोष्टींना पचवून बाजाराने नवीन शिखर गाठले.सेन्सेक्स व निफ्टीने अनुक्रमे ५३,२६६.१२  व १५,९५२.३५ चा विक्रमी स्तर गाठला.येणाऱ्या काळात अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल व येणाऱ्या काळात तिमाही निकाल चांगले लागतील या आशावादाने बाजार तेजीत होता.आय.टी. क्षेत्रात तुफान तेजी होती.बी.एस.ई.मध्ये  Infosys, Larsen & Toubro, Larsen & Toubro Infotech, L&T Technology Services, Tata Elxsi, Tata Steel, Tech Mahindra, Wipro, Birlasoft, Coforge, Cyient, Mindtree, Mphasis, OFSS, Bajaj Finserv, ACC, Ambuja Cements, Apollo Hospitals, InterGlobe Aviation (IndiGo), IRCTC, Manappuram Finance, Marico आणि Sobha या शेअर्स बरोबर आणखी ५०० कंपन्यांनी आपला ५२आठवड्यांचा उच्चतम स्तर नोंदवला. Sensex, Nifty Hit Record Highs Led By Gains In IT, Banking Shares. Sensex and the Nifty log healthy gains to settle at record closing highs.

 

बाजारात विक्रमी स्तरावर नफावसुली. Market ends flat after hitting record highs

आठवडयाच्या शेवटच्या दिवशी वैश्विक बाजार सुस्त होते. आशियाई बाजार देखील नरम होते.भारतीय बाजाराची सुरुवात चांगली झाली. बाजाराने नवीन विक्रमी स्तर गाठला.फार्मा क्षेत्रात बहार होती SUN PHARMA, CIPLA, DIVIS LAB हे शेअर्स चांगलेच वाढले. .निफ्टी फार्मा इंडेक्सने नवीन विक्रमी स्तर गाठला.मेटल क्षेत्रात सुद्धा तेजी होती.बाजाराने विक्रमी स्तर नोंदवल्यानंतर वरच्या स्तरावर नफावसुली झाली.बाजार बंद होताना सपाट बंद झाला सेन्सेक्सने १८.७९अंकांची वाढ घेऊन ५३,१४०.०६ व निफ्टीत मामुली घसरण होऊन १५,९२३.४० चा बंद दिला. Markets end flat, with a negative bias, in noon trading after opening at fresh all-time highs due to selling pressure in information technology and banking shares. Sensex, Nifty Log Best Weekly Gains In Over A Month

जितेश सावंत

शेअर बाजार तज्ञ,

Technical and Fundamental Analyst-Stock Market

jiteshsawant33@gmail.com    

Nifty on the threshold of 16,000
ML/KA/PGB
17 july 2021

mmc

Related post