बँक पत वाढ 59 वर्षातील निचांकी पातळीवर

 बँक पत वाढ 59 वर्षातील निचांकी पातळीवर

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथीला (corona pandemic) सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन पॅकेजेस दिली परंतू त्यानंतरही वित्तीय वर्ष 2021 मध्ये सलग दुसर्‍या वर्षी बँक पत वाढ (Credit growth) कमी पातळीवरच राहिली. एसबीआय रिसर्चनुसार (SBI research) आर्थिक वर्ष 2021 मध्ये बँक पत वाढ 5.56 टक्के होती, जी 59 वर्षातील सर्वात कमी आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये एकूण पतपुरवठा (व्यापार) 109.51 लाख कोटी रुपये होता, जो आर्थिक वर्ष 2020 च्या तुलनेत कमी होता तर बँकेची पत वाढ 58 वर्षांच्या निचांकावर सुमारे 6.14 टक्के होती. यापेक्षा कमी पत वाढ आर्थिक वर्ष 1962 मध्ये 5.38 टक्के होती. आर्थिक वर्ष 2019 मध्ये पतपुरवठा 13.29 टक्क्यांनी वाढला होता.
पत वाढीमध्ये (Credit growth) घट झाली असली तरी एसबीआय रिसर्चने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आकडेवारीचा संदर्भ देऊन सांगितले की सिस्टीम वाइड ठेवींमध्ये (Deposites) 11.4 टक्क्यांची वाढ झाली आहे आणि 151.13 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे तर आर्थिक वर्ष 2020 मध्ये ती 7.93 टक्केच होती .

वित्तीय वर्ष 2008 मधील पत वाढ सर्वोत्तम
Credit growth best for fiscal year 2008

एसबीआय रिसर्च अहवालानुसार आर्थिक वर्ष 2008 ची पत वाढ (Credit growth) सर्वोत्तम होती आणि ठेवी वृद्धीच्या (Deposites) बाबतीतही आर्थिक वर्ष 2008 सर्वोत्कृष्ट होते. त्या आर्थिक वर्षात पतपुरवठा 22.3 टक्क्यांनी आणि ठेवींमध्ये 22.4 टक्क्यांनी वाढ झाली होती. मात्र पुढील दोन आर्थिक वर्षांत त्यात 17 टक्क्यांची घट झाली आणि आर्थिक वर्ष 2011 मध्ये ते पुन्हा 21.5 टक्क्यांच्या पातळीवर पोहोचले. तेव्हापासून पत मागणीत घट झाली आहे आणि वित्तीय वर्ष 2020 मध्ये ते 58 वर्षातील निचांकावर आणि आर्थिक वर्ष 2021 मध्ये 59 वर्षातल्या निचांकावर पोहोचली आहे.
अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कोरोना साथीमुळे पतपुरवठ्याला सर्वात मोठा धक्का बसला होता जेव्हा आर्थिक घडामोडी जवळपास ठप्प झाल्या होत्या. त्यानंतर दुसर्‍या सहामाहीत नोव्हेंबरपासून त्यात काही प्रमाणात सुधारणा दिसून आली. मात्र संपूर्ण वर्षाबाबत बोलायचे झाले तर पत वाढ (Credit growth) 59 वर्षातल्या निचांकावर पोहोचली.

टाळेबंदीमुळे ठेवींमध्ये वाढ
Increase in deposits due to lockdown

गेल्या वर्षी कोरोना साथीमुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे एप्रिल आणि मे 2020 मध्ये ठेवी (Deposites) वाढल्या. व्याजदरात घट झाली असतानाही ठेवी वाढल्या कारण टाळेबंदीमुळे लोकांसमोर खर्चाचे पर्याय कमी होते. आर्थिक वर्ष 2021 मध्ये ठेवींमध्ये 11.4 टक्क्यांची वाढ झाली तर आर्थिक वर्ष 2020 मध्ये ठेवी 7.93 टक्क्यांनी वाढल्या होत्या आणि ठेवी 135.71 लाख कोटी रुपयांच्या होत्या. आर्थिक वर्ष 2019 मध्ये ठेवी 10.04 टक्क्यांनी आणि आर्थिक वर्ष 2018 मध्ये 6.21 टक्क्यांच्या दराने वाढल्या होत्या.
 
The central government offered stimulus packages to deal with corona pandemic, but for the second year in a row, credit growth remained low. According to SBI Research, bank credit growth was 5.56 per cent in FY2021, the lowest in 59 years. The lowest credit growth was 5.38 per cent in FY1962. In FY19, credit growth was 13.29 per cent.
 
PL/KA/PL/24 APR 2021

mmc

Related post