बँक ऑफ बडोदाला पतवाढ अपेक्षित

 बँक ऑफ बडोदाला पतवाढ अपेक्षित

मुंबई, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सरकारी मालकीची बँक ऑफ बडोदा (BOB) ने सांगितले की, चालू आर्थिक वर्षात ते 7 ते 10 टक्के पतवाढ (Credit Growth) साध्य करण्याच्या मार्गावर आहेत. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव चढ्ढा यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आगाऊ रक्कम 10 ते 12 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत बँकेचे (BOB) सकल देशांतर्गत पतवाढ (Credit Growth) वार्षिक 3.36 टक्क्यांनी वाढून 6,54,315 कोटी रुपये झाली होती. परंतू त्याआधीच्या तिमाहीच्या तुलनेत देशांतर्गत पतवाढ पाच टक्के आहे.

चढ्ढा म्हणाले की, ज्याठिकाणी आगाऊ रकमेचा संबंध आहे, बँकेला पहिल्या तिमाहीत कोविड-19 साथीच्या रोगाच्या उद्रेकामुळे काही आव्हानांना सामोरे जावे लागले, परंतु दुसऱ्या तिमाहीत त्यात सुधारणा झाली आहे.

State-owned Bank of Baroda (BOB) said it was on track to achieve a 7 to 10 per cent Credit Growth in the current financial year. Sanjeev Chadha, managing director and chief executive officer of the bank, said the advance is expected to increase by 10 to 12 per cent in the financial year 2022-23.

PL/KA/PL/7 FEB 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *