कोरोनाच्या तीव्र लाटेच्या विळख्यामुळे भांडवली बाजारातील (शेअर मार्केट) गुंतवणूकदार धास्तावले.
मुंबई, दि.24(एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात भांडवली बाजारात खूप उतार- चढाव होता, कोरोनाच्या विक्रमी रुग्णवाढीचा फटका बाजाराला बसला,गुंतवणूकदारांनी वरच्या स्तरावर नफावसुली सुरूच ठेवली,विदेशीबाजारात देखील उतार चढाव बराच होता, १८ वर्षावरील व्यक्तींना १ मे पासून लसीकरण मोहिमेत भाग घेण्याचा निर्णय या आठवड्यात झाला, येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांचे लक्ष हे या मोहिमेच्या वेगावरती असेल.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा अधिक तीव्र
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर काही केल्या थांबत नाही आहे.ह्या लाटेचा विळखा दिवसागणिक अजून घट्ट झाल्याचे दिसत आहे. २४ तासात २ लाख ७५ हजार नवीन रुग्ण बाधित झाले.व त्याचा फटका पुन्हा एकदा भांडवली बाजाराला बसला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने तसेच काही राज्यांनी बरेच निर्बंध लावल्याने आर्थिक व्यवहार ठप्प होतील व त्याचा असर अर्थव्यवस्थेवर होईल या भीतीने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा चौफेर विक्री केली फार्मा सेक्टर वगळता इतर सर्व सेक्टर मध्ये गुंतवणूकदारांनी विक्रीकेली. शेवटच्या तासात खालच्या स्तरावर थोडी खरेदी झाली
Markets nosedived as surging COVID-19 cases and the imposition of restrictions .The Sensex fell 882 points to 47,949, and the Nifty50 fell 258 points to 14,359. pressure was seen in realty, capital goods, public sector, and power stocks, banking sector pressured the market .
१८ वर्षावरील व्यक्तींना १ मे पासून लस उपलब्ध होणार
vaccine for all above age of 18 years from May 1
मंगळवारी सकाळी मार्केटमध्ये तेजीचे वातावरण होते व त्याचे मुख्य कारण म्हणजे १८ वर्षावरील व्यक्तींना १ मे पासून लस उपलब्ध होणार हे होते आशियाई व अमेरिकन बाजारातून नरमाईचे संकेत होते.सरकारने लसीच्या उत्पादनाकरिता सीरम तसेच भारत बायोटेक याना ४५००करोड रुपये मदत जाहीर केली.,विदेशातून येणाऱ्या लसीची आयात शुल्क माफ केली. डॉ रेड्डीज(Dr.Reddy’s) ,फायझर(Pfizer),कॅडीला(Cadila),पॅनेशिया बायो(Panacea Biotec) ,अस्त्राझेनेका(AstraZeneca)अश्या समभागात थोडाही खरेदी झाली. सिमेंट(Cement) आणि फार्मा(Pharma) समभागात चांगली तेजी होती परंतु महाराष्ट्रात कदाचित संपूर्ण टाळेबंदी जाहीर होईल या भीतीने दुपारनंतर मार्केट वरच्या स्तरावरून घसरले. Sensex fails to hold on to gains, Tuesday was a volatile day. Sensex fell 700 points from the high. Markets witnessed a bounce-back in its opening trade, market failed because of weak global cues and the possibility of a stricter lockdown in Maharashtra.
ब्रिटनने भारतासाठी नवीन प्रतिबंध जाहीर केले
Britain adds India to Covid-19 travel ‘red list’
ब्रिटनने भारतासाठी नवीन प्रतिबंध जाहीर केले २३ एप्रिल पासून भारतातून परत जाणारा नागरिक ब्रिटनमध्ये प्रवेश करू शकत नाही असे तेथील सरकारने सोमवारी जाहीर केले. भारतातील कोरोनाव्हायरसची दुसरी लाट बघता जगातील अनेक देशांची चिंता वाढली आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना भारताचा प्रवास टाळण्याचे सल्ला दिला आहे. ब्रिटनने देखील (UK) भारताला ‘रेड लिस्ट’ मध्ये समाविष्ट केले आहे.
बुधवारी रामनवमी निमित्त मार्केट बंद होते
कोरोनाचा कहर सुरूच, दुपारनंतर मार्केट सावरले
Index showed a good pull back
बुधवारी अमेरिकन मार्केटमध्ये दोन दिवसांच्या पडझडीनंतर वाढ झाली. गुरुवारी सकाळी आशियाई बाजारात चांगले संकेत होते, परंतु २४ तासात देशामध्ये कोरोना रुग्णवाढीचा नवीन विक्रम प्रस्थापित झाला होता , ३ लाख १५ हजारहून जास्त लोक बाधित झाले होते याचा फटका मार्केटला बसला व मार्केटची सुरुवात निराशाजनक झाली सेन्सेक्स सकाळी ४८० अंकांनी घसरला. परंतु वीकली एक्सपायरी (Weekly Expiry) असल्याने दुपारनंतर मार्केट सावरले, १८ वर्षावरील लसीकरण मोहिमेवर सगळ्यांचे लक्ष आहे. १८वर्षावरील लसीकरणासाठी २८ एप्रिल पासून नोंदणी सुरु होणार या बातमीने सुद्धा बाजार सावरण्यास मदत झाली. बँकिंग सेक्टर(Banking Sector) मध्ये आज चांगलीच वाढ झाली.आयसीआयसीआय बँक(ICICI Bank), एचडीएफसी बँक(HDFC Bank) तसेच कोटक महिंद्रा बँक(KotakMahindraBank) या समभागांनी बाजाराला सावरले. The index showed a good pull back, and managed to close the day on a positive note. Buying was seen in banks, finance, metals, realty. People over 18 years can register for COVID-19 vaccines from April 28.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात कमजोरी
कालच्या तेजीनंतर आज पुन्हा एकदा मार्केट मध्ये कमजोरी होती मार्केट ची सुरुवात घसरणीने झाली. विदेशी बाजारातून आज मिश्र संकेत होते. अमेरिकन मार्केट गुरुवारी खालच्या स्तरावर बंद झाले,अमेरिकन अध्यक्ष बायडन यांनी श्रीमंत लोकांवरती अधिक कर लावण्याचे संकेत दिल्याने मार्केट घसरले.( President Joe Biden will propose almost doubling the capital gains tax rate for wealthy individuals ) भारतात २४ तासात कोरोनारुग्णसंख्येने पुन्हा एकदा विक्रमी नोंद केली ३ लाख ३२ हजाराहून अधिक केसेस समोर आल्या. जपान मध्ये सुद्धा कोरोनाच्या संकटामुळे आणीबाणी लागण्याची संभावना आहे. टोकियो समवेत इतर तीन शहरात २५ एप्रिल ते ११ मे पर्यंत आणीबाणी लागण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात कमजोरी होती.मार्केट बंद होताना सेन्सेक्स मध्ये २०२ अंकांची घसरण झाली,निफ्टीने १४५३० च्या खाली बंद दिला. आयसी आयसी आय बँक (ICICI Bank),इन्फोसिस (Infosys), हिंदुस्थान युनिलिव्हर(Hindustan Unilever), एच. डी.एफ. सी बँक (HDFC Bank) आणि भारती एअरटेल (Bharti Airtel) या समभागांवर दबाव होता. Market closed in the red on weak global cues,and consistent rise in coronavirus cases.
कॅडीलाच्या औषधाला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी
Cadila received DCGI approval for a COVID-19 drug
झायडस कॅडिलाचे (Zydus Cadila’s) ‘विराफिन’ (Virafin) औषधाला आपात्कालीन वापरासाठी ड्रुग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून मान्यता मिळाली आहे.
Zydus Cadila had received emergency use approval from DCGI for the use of ‘Virafin’, Pegylated Interferon alpha-2b (PegIFN) in treating moderate COVID-19 infection in adults.
येणाऱ्या काळात मार्केट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात उतरचढाव होण्याची शक्यता अधिक असल्याने गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व शक्यतो दीर्घकाळाकरिताच गुंतवणूक करावी. फार्मा (Pharma) व आय.टी(I.T) सेक्टरमध्ये पडझडीत दीर्घकाळाकरिता गुंतवणूक करावी येणाऱ्या काळात वैश्विक बाजारात घडणाऱ्या गोष्टीवरती भारतीय बाजाराचे लक्ष असेल व त्यानुसार तो आपली दिशा ठरवेल.
Market would be volatile in near term.
(मार्केट मध्ये गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा )
जितेश सावंत
शेअर बाजार तज्ञ,
Technical and Fundamental Analyst-Stock Market
jiteshsawant33@gmail.com
Investors should be cautious and invest as long as possible as the market is likely to fluctuate dramatically in the near future. The Indian market will keep a close eye on what is happening in the global market in the coming period of long-term investment in the pharma and IT sectors.
ML/KA/PGB
24 april 2021