ऑगस्टमध्ये जीएसटी संकलनात 30 टक्के वाढ

 ऑगस्टमध्ये जीएसटी संकलनात 30 टक्के वाढ

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या (corona) प्रभावातून अर्थव्यवस्था सावरत असतानाच आणखी एक चांगली बातमी आहे. ऑगस्टमध्ये सरकारला वस्तू आणि सेवा कर संकलनातून (GST collection) 1,12,020 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. जुलैमध्ये हा आकडा 1.16 लाख कोटी रुपये होता.

जीएसटी संकलन वार्षिक 30 टक्क्यांनी वाढले
GST collection increased by 30 per cent annually

ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन (GST collection) वार्षिक आधाराने 30 टक्के वाढले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन 86,449 कोटी रुपये झाले होते. कोरोना विषाणू (corona virus) संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे जीएसटी संकलनावर परिणाम झाला आणि जूनमध्ये जीएसटीचे उत्पन्न 1 लाख कोटी रुपयांच्या खाली आले. त्याआधी सलग 9 महिने जीएसटी संकलन 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.

सरकारला उपकरामधून 8,646 कोटी रुपये मिळाले
The government received Rs 8,646 crore from cess

ऑगस्टमध्ये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST) संकलन 20,522 कोटी रुपये होते. राज्य वस्तू आणि सेवा कर (SGST) 26,605 कोटी रुपये होते. एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (IGST) 56,247 कोटी रुपये होता, तर उपकर 8,646 कोटी रुपये होता.

देशांतर्गत व्यवहारातून 27 टक्के जास्त महसूल
27 per cent higher revenue from domestic transactions

ऑगस्ट 2021 मध्ये देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा महसूल 27 टक्क्यांनी वाढला. आर्थिक वर्ष 2019-20 च्या तुलनेत ऑगस्ट 2021 मध्ये जीएसटी संकलन (GST collection) 14 टक्के जास्त आहे. ऑगस्ट 2019 मध्ये जीएसटीमधून मिळालेला महसूल 98,202 कोटी रुपये होता.

खोटी बिले तयार करण्यांवरील कारवाईचा जीएसटी संकलनात मोठा हात
Big hand in GST collection of action on making false bills

अर्थ मंत्रालयाने सांगितले की कोरोना विषाणू (corona virus) संसर्गाचे रुग्ण कमी झाल्यानंतर जीएसटी संकलन (GST collection) 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. कर संकलनात झालेल्या वाढीवरुन अर्थव्यवस्था वेगाने सावरत आहे हे स्पष्ट होत आहे. वित्त मंत्रालयाच्या मते, कर चोरीला आळा घालण्याच्या मोहिमा, विशेष करुन खोटी बिले तयार करणार्‍यां विरोधातील कारवाई जीएसटी संकलन वाढवण्यात महत्त्वाची ठरली आहे.
 
There is more good news as the economy recovers from the effects of the corona. In August, the government collected Rs 1,12,020 crore from goods and services tax collection. In July, the figure was Rs 1.16 lakh crore.
PL/KA/PL/02 SEPT 2021
 

mmc

Related post