सलग 26 तास सूर्यनमस्कार साखळीचे आयोजन

अकोला, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रथसप्तमीचे औचित्य साधून सूर्यनमस्कार दिनाचे निमित्ताने अकोल्यात अजिंक्य फिटनेस क्लब सह विविध संस्थांच्या वतीने सलग २६ तास सूर्यनमस्कार साखळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तीस महिन्यांच्या चिमुकल्यासह 87 वर्षांचे जेष्ठ नागरिक सूर्य साखळीमध्ये सहभागी झाले होते.
आजच्या काळात योग अत्यंत महत्त्वाचा असून सूर्यनमस्काराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अकोल्यात अखंड सविस्तर सूर्यनमस्कार साखळीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, योगप्रेमी असे २ हजार नागरिक सहभागी झाले.४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजतापासून ५ सकाळी ८ वाजतापर्यंत अखंड २६ तास सुर्यनमस्कार साखळी उपक्रम संपन्न होणार आहे.यामध्ये जास्तीत जास्त दोन तास, कमीत कमी १२ सूर्यनमस्काराची नोंद होणार आहे. अशी माहिती अजिंक्य फिटनेस क्लबचे धनंजय भगत यांनी दिली.
योगाच्या माध्यमातून निरोगी आरोग्याचा संदेश दिला जात असून अकोल्यातील मूक बधिर शाळेतील विद्यार्थी यांनी सूर्यनमस्कार साखळी मध्ये सहभागी होत सूर्यनमस्कार करून योग तथा प्राणायामाचा संदेश दिला.
रथ सप्तमीच्या निमित्ताने अकोल्यात विविध संस्थांच्या वतीने अनेक वर्षांपासून सूर्यनमस्कार साखळीचे आयोजन करण्यात येते या माध्यमातून योग प्राणायाम , सूर्यनमस्काराबद्दल जाणीव आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सूर्यनमस्काराच्या निमित्ताने जनजागृती होत आहे.
अखंड 26 तास सूर्यनमस्कार साखळी आयोजनाच्या माध्यमातून विविध स्तरातील नागरिक दिव्यांग सूर्यनमस्कार साखळी मध्ये सहभागी होत असून या माध्यमातून योगाचे महत्व प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा होत असलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
ML/ML/SL
4 Feb. 2025