कुठलीही क्लीनचीट मिळालेली नाही

 कुठलीही क्लीनचीट मिळालेली नाही

मुंबई , दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज आलेल्या त्या बातमीत काहीही तथ्य नाही. चौकशी सुरू आहे. कुठलीही क्लीनचीट मिळालेली नाही. कशाच्या आधारे बातमी देण्यात आली माहीत नाही असा स्पष्ट खुलासा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र बँकेबाबतच्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला.गारपीटीने शेतकऱ्यांचे एक लाख एकरापेक्षा जास्त नुकसान कालपर्यंत झाले होते. अजुनही गारपीठ आणि अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यामुळे उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान होणार आहे. गारपीट जी होत आहे त्याने अक्षरशः बर्फाचा थर जमा होत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मंगळवारी पत्र देऊन प्रतिहेक्टर ५० हजार रुपये आणि एक लाख रुपये प्रति हेक्टर फळबागांसाठी द्या अशी मागणी केली आहे.या संदर्भात आज भेट घेतली असे अजित पवार यांनी सांगितले.

ML/KA/PGB 12 APR 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *