नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत जाहीर करा

 नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत जाहीर करा

नाशिक, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): निफाड तालुक्यातील चांदोरी गावामध्ये बेमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, असे दानवे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे परंतु सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाला आहे. आधीचेच मार्च महिन्यातील नुकसानीचे पंचनामे झालेले नसून परत एकदा अवकाळी संकट आले असून सरकार नुसतं बघत असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत करावी असे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे आज निफाड तालुक्यात चांदोरी येथे अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला, यावेळी माजी आमदार अनिल कदम, तहसीलदार शरद घोरपडे आणि महसूल अधिकारी उपस्थित होते.निफाड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांचे नुकसान झाले असून याकरता द्राक्ष बागायतदार मोठ्या प्रमाणात बाग उभे करण्याकरता खर्च करतात मात्र अशा अवकाळीने नुकसान झाल्यानंतर सरकार याला मदत किती करणार व कधी करणार सरकारने जवळपास एकरी एक लाख रुपये मदत द्यावी असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत त्यांनी नुसते दौरे न करता शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी असे दानवे यांनी सांगितले.

ML/KA/PGB 12 APR 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *