मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय काळाची गरज

 मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय काळाची गरज

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील वाहतूक कोंडीतून सामान्य मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी मुंबईसाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी आढावा घेतला.An alternative to double-decker tunnels for Mumbai is the need

मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय अवलंबण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी आणि एकात्मिक वाहतूक प्रणाली यंत्रणा तयार करणाऱ्या तंत्रज्ञांनी बैठक घ्यावी त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे Chief Minister Shinde यांनी दिले.

वर्षा निवासस्थानी यासंदर्भात झालेल्या या बैठकीत मुंबईतील वाढती वाहतूक आणि त्यावरील उपाय, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. मल्टी मॉडेल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क टनेलच्या माध्यमातून साकारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

एमएमआरडीए क्षेत्र एकात्मिक वाहतूक प्रणालीद्वारे जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. मुंबईसाठी मल्टीडेक टनेल काळाची गरज असून त्याचा अभ्यास करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन, मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी तांत्रिक टीम सोबत बैठक घेऊन या एकात्मिक वाहतूक प्रणालीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

ML/KA/PGB
12 Jan. 2023

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *