कृषीमंत्री सत्तार यांनी केली शेती नुकसानीची पाहणी

 कृषीमंत्री सत्तार यांनी केली शेती नुकसानीची पाहणी

अकोला, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची बांधावर जाऊन पाहणी केली . Agriculture Minister Sattar inspected the agricultural damage

यावेळी गारपीटीमुळे लिंबू कांदा यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसोबत महाराष्ट्र शासन पूर्णपणे सोबत असून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासन पूर्णतोवरी शेतकऱ्यानं सोबत असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बेलुरा गावातील शेती पाहणी करतावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना केले.

कृषी मंत्री सत्तार यांनी अकोला जिल्ह्यातील पारस येथे मोठे झाड कोसळून झालेल्या सात भाविकांच्या मृत्यू संदर्भात शोक संवेदना व्यक्त करीत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांची व जखमीची भेट घेण्यासाठी पारस व अकोला येथे भेट देणार असल्याची माहिती कृषीमंत्री यांनी दिली.

ML/KA/PGB
10 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *