आर. के. विधी महाविद्यालयाचा भांडुप पश्चिम येथे उद्घाटन.

मुंबई, दि २
भांडुप येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व बार कौन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त मुंबई विद्यापीठाशी संलग्न – आर. के. विधी महाविद्यालयाचा काल भांडुप पश्चिम येथे उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले तसेच पद्मश्री मा. अॅड. खा. उज्ज्वल निकम यांची उपस्थिती लाभली. ईशान्य मुंबई चे खासदार संजय दीना पाटील यांची समाजसेविका कन्या राजोल संजय पाटील यांनी उपस्थित राहून महाविद्यालयाचे संचालक श्री. रमेश खानविलकर सर व श्री. रिद्धेश खानविलकर यांचे अभिनंदन केले व पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. ML/ML/MS
