लिंबाच्या दरात मोठी घसरण

जालना दि १८– जालन्याच्या उटवद येथे लिंबाच्या दरात मोठी घसरण झाली असून मे महिन्यात 100 रुपये प्रतिकिलोने विकले जाणारे लिंबू आता 15 रुपये प्रति किलोने विकले जात असल्याने लिंबू उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत.
बाजारात लिंबाची आवक कमी असल्याने मे महिन्यात 100 रुपये प्रतिकिलोने लिंबू विक्री होत होती. मात्र, जून महिन्यात बाजारात लिंबूची आवक वाढलेल्या 100 रुपये किलोने विकले जाणारे लिंबू आता फक्त 15 रुपये प्रति किलोदराने विक्री होत आहेत. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत. ML/ML/MS