इस्त्रायली गुप्तचर यंत्रणेच्या मुख्यालयावर इराणचा हल्ला

 इस्त्रायली गुप्तचर यंत्रणेच्या मुख्यालयावर इराणचा हल्ला

इस्रायल आणि इराणमधील संघर्ष पाचव्या दिवशीही सुरू आहे. आज इराणने तेल अवीव येथील इस्रायलच्या गुप्तचर संस्थेच्या मोसादच्या मुख्यालयावर हवाई हल्ला केला. याशिवाय लष्करी गुप्तचर संस्थेशी संबंधित अमान या गुप्तचर संस्थेच्या इमारतीलाही लक्ष्य करण्यात आले आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी मेजर जनरल अली शादमानी यांचा मृत्यू झाला आहे. शादमानी हे इराणच्या खातम-अल-अंबिया मुख्यालयाचे म्हणजेच लष्करी आपत्कालीन कमांडचे प्रमुख होते. त्यांनी केवळ ४ दिवसांपूर्वीच हे पद स्वीकारले होते.

इस्रायली हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मेजर जनरल गुलाम अली रशीद यांच्या जागी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. रशीद यांचे गेल्या शुक्रवारी निधन झाले. इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत २२४ इराणी नागरिक ठार झाले आहेत, तर १,४८१ जण जखमी झाले आहेत. त्याच वेळी, इस्रायलमध्ये आतापर्यंत २४ जण ठार झाले आहेत, तर ६०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *