अहमदाबाद विमान अपघातातील मृतांची संख्या 275 वर, 248 मृतदेहांची DNA चाचणी पूर्ण

अहमदाबाद, दि. १४ : अहमदाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण विमान अपघातात विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्याच बरोबर विमान ज्या इमारतीवर आदळले त्या मेडिकल कॉलेज हॉस्टेलमधील काही डॉक्टर्स आणि परिसरातील काही सामान्य नागरिकांचाहा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे उपसिव्हिल अधीक्षक रजनीश पटेल यांनी सांगितले की,आजपर्यंत २४८ मृतदेहांचे डीएनए नमुने क्रॉस व्हेरिफाय झाले आहेत, त्यापैकी ६ जणांचे डीएनए जुळले आहेत. ८ जखमी अजूनही रुग्णालयात आहेत. एकाची प्रकृती गंभीर आहे. सर्वांवर उपचार सुरू आहेत.
अहमदाबादमध्ये विमान अपघातस्थळावरून आज आणखी एक मृतदेह सापडला. आज, बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातून मलबा काढताना, तो विमानाच्या शेवटी अडकलेला आढळला, जो खाली आणण्यात आला. नंतर त्याचे पोस्टमार्टम करण्यात आले. असे म्हटले जात आहे की हा मृतदेह एअर होस्टेसचा असू शकतो. दुसरीकडे, मृतांच्या डीएनए सॅम्पलिंगचे काम आजही सुरू आहे. सिव्हिल हॉस्पिटलबाहेर नातेवाईकांची गर्दी आहे. येथे कडक सुरक्षा व्यवस्था आहे. पोस्टमार्टम युनिटभोवती बाहेरील लोकांना प्रवेश बंदी आहे.
दरम्यान अपघातग्रस्त विमानाचा पायलट सुमित सभरवालने एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) ला पाठवलेला शेवटचा संदेश समोर आला आहे. ४-५ सेकंदाच्या मेसेजमध्ये, सुमित म्हणत आहे, ‘मेडे, मेडे, मेडे… जोर मिळत नाहीये. पॉवर कमी होत आहे, विमान वर उड्डाण घेत नाहीये. वाचणार नाही.’
पीटीआयच्या वृत्तानुसार, एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या विमानाच्या उजव्या इंजिनची दुरुस्ती मार्चमध्ये करण्यात आली होती. याशिवाय डाव्या इंजिनचीही तपासणी करण्यात आली होती. जून २०२३ मध्ये त्याची पूर्णपणे तपासणी करण्यात आली होती. पुढील तपासणी या वर्षी डिसेंबरमध्ये होणार होती. विमानात जीई एरोस्पेसने बनवलेले जीएनएक्स इंजिन बसवण्यात आले होते. विमानाच्या इंजिनमध्ये कोणतीही समस्या नव्हती.
SL/ML/SL