थायलडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडींग

 थायलडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडींग

फुकेत, दि. १३ : आज थायलंडमधील फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय ३७९ ला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर थायलंडमध्ये विमानाचे आपात्कालीन लँडिंग करावे लागले. एअर इंडियाच्या या विमानातील १५६ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. हे विमान अंदमान समुद्रावरून फुकेत विमानतळावर परत आले. धमकी देणाऱ्या व्यक्तीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. काल अहमदाबाद येथे झालेल्या AIR India च्या भीषण अपघातानंतर आजची ही घटना गंभीर समजली जात आहे.

टेकऑफनंतर काही वेळातच अज्ञात स्त्रोताकडून बॉम्ब धमकी मिळाल्याने विमानाने अंडमान समुद्रावरून वळसा घेत पुन्हा फुकेत विमानतळावर सुरक्षितपणे लँडिंग केलं. थायलंडच्या विमानतळ प्राधिकरणाने (Airports of Thailand – AOT) दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवाशांना आपत्कालीन नियमानुसार सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून कोणतीही जखम किंवा जीवितहानी झालेली नाही.

फ्लाइट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म Flightradar24 नुसार, विमानाने ९:३० वाजता (स्थानिक वेळेनुसार) उड्डाण केलं होतं आणि काही वेळातच त्याने मोठा वळसा घेत पुन्हा फुकेतकडे परतण्याचा निर्णय घेतला. सध्या स्थानिक सुरक्षा यंत्रणा आणि विमानतळ प्रशासन या धमकीचा तपास करत आहेत. अद्याप धमकीचं मूळ किंवा स्वरूप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. एअर इंडियाने या घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे ही घटना अहमदाबाद विमान अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी घडल्याने भारतीय नागरी विमान वाहतुकीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *