आता Apple बनवणार स्मार्ट चष्मे

Bloomberg आणि TechTimes च्या अहवालानुसार, Apple २०२६ च्या अखेरीस आपले पहिले AI-सक्षम स्मार्ट चष्मे बाजारात आणण्याची योजना आखत आहे. हे ग्लासेस Meta च्या Ray-Ban AI चष्म्यांना टक्कर देतील, पण Apple चा भर असेल सिरी, iPhone इंटिग्रेशन आणि प्रीमियम डिझाइनवर आहे. Apple यासाठी Apple Watch सारख्या कमी ऊर्जा वापरणाऱ्या चिप्सवर आधारित खास प्रोसेसर तयार करत आहे. यामुळे ग्लासेस हलक्या, कार्यक्षम आणि दीर्घकालीन वापरासाठी योग्य असतील. २०२५ अखेरीस प्रोटोटाइप तयार होतील. २०२६ अखेरीस ग्राहकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. किंमत अद्याप जाहीर नाही, पण Vision Pro ($3,499) पेक्षा स्वस्त असण्याची शक्यता आहे.
काय असेल विशेष ?
Siri सह थेट संवाद – तुमच्या डोळ्यांसमोरच तुमचं कॅलेंडर, मेसेजेस, नेव्हिगेशन
कॅमेरे, मायक्रोफोन आणि स्पीकर्स – फोटो, व्हिडीओ, कॉल्स, लाईव्ह ट्रान्सलेशन
Visual Intelligence – समोर दिसणाऱ्या वस्तू, पत्ते, माहिती ओळखणे
iPhone आणि iCloud शी थेट कनेक्टिव्हिटी – नोटिफिकेशन, कॉल्स, संगीत, सगळं हातात न घेता
Turn-by-turn नेव्हिगेशन आणि AI सहाय्य – सायकलिंग, चालणे, प्रवास अधिक स्मार्ट