संत गजानन महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांसाठी ५१ हजार लाडूंचा महाप्रसाद

वाशीम दि ११:– वाशीमच्या रिसोड शहरात आज सायंकाळी श्री संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा दाखल होणार आहे. या निमित्ताने रिसोड येथील श्री संत गजानन महाराज पालखी उत्सव समितीच्या वतीने तयारी सुरू असून,
वारकऱ्यांसाठी महाप्रसादात लाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी ५१ हजार लाडू तयार करण्यात आले आहेत. वाशीम जिल्ह्यात आज रिसोड शहरात गजानन महाराजांच्या पालखीचा चौथा आणि शेवटचा दिवस असून रिसोड येथून मुक्काम झाल्यानंतर सकाळी पालखी मराठवाड्याच्या हिंगोलीकडे मार्गस्थ होणार आहे.