परदेशी चित्रपटांवर ट्रम्प आकारणार १००% कर

 परदेशी चित्रपटांवर ट्रम्प आकारणार १००% कर

अमेरिकन चित्रपट उद्योगाला पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. सर्वप्रथम अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी अनेक देशांवर आयात शुल्क लादले. आता त्यांनी चित्रपटांवरही कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेबाहेर बनवलेल्या सर्व चित्रपटांवर 100 टक्के कर लादण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले असल्याची घोषणा केली. देशांतर्गत सिनेमा निर्मितीसाठी टॅरिफमध्ये वाढ करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. या निर्णयामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसलाय आहे.

ट्रम्प यांच्या मते, अनेक देश त्यांच्या चित्रपट निर्मात्यांना अनुदाने देतात, ज्यामुळे अमेरिकेतून चित्रपट निर्मिती बाहेर जात आहे, आणि याचा मोठा परिणाम हॉलिवूडवर होत आहे. ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की काही परदेशी चित्रपट प्रचाराचे साधन म्हणून वापरले जातात आणि त्यामुळे अमेरिकेच्या सांस्कृतिक प्रभावावर परिणाम होतो. या निर्णयामुळे हॉलिवूडमध्येही गोंधळ उडाला असून, अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली आहे.

या निर्णयामुळे चित्रपट तिकीटांचे दर वाढण्याची शक्यता असून नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ यांसारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरही प्रभाव पडू शकतो. भारत, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांनी या निर्णयाची दखल घेतली असून, त्यांच्या चित्रपट उद्योगावर याचा परिणाम होईल का याची पडताळणी सुरू आहे. अद्याप हा प्रस्ताव अंतिम करण्यात आलेला नसला तरी, याची अधिकृत प्रक्रिया सुरू असल्याचे ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा निर्णय जागतिक चित्रपट उद्योगावर मोठा प्रभाव टाकू शकतो.

Trump to impose 100% tax on foreign films

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *