या राज्यात आढळला आशियातील सर्वांत मोठा वाघ

उत्तराखंडातील फॅटो पर्यटन क्षेत्रात सध्या एक भलामोठा वाघ विलक्षण आकर्षण बनले आहे. जिम कॉर्बेट जंगलात आशियातील सर्वात मोठा वाघ पाहायला मिळाला आहे. या वाघला ‘हरक्यूलिस’ (Hercules) हे नाव देण्यात आले आहे.
सुमारे 300 किलोग्रॅम वजन आणि 7 फूट लांबीचा हा महाकाय वाघ वन्यजीव प्रेमींमध्ये आणि स्थानिकांमध्ये प्रचंड उत्सुकतेचा विषय बनला आहे. अनेकांचा असा विश्वास आहे की, ‘हरक्यूलिस’ सध्या आशियातील सर्वात मोठा वाघ असू शकतो. या वाघाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
राष्ट्रीय स्तरावर, भारतात सध्या 3682 ते 3925 वाघ असून, मध्य प्रदेश (785 वाघ) व कर्नाटक (563 वाघ) आघाडीवर आहेत. वन्यजीव तज्ञांचं म्हणणं आहे की जर ‘हरक्यूलिस’ खरोखर आशियातील सर्वात मोठा वाघ ठरला, तर फॅटो झोनला आंतरराष्ट्रीय ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
Hercules biggest Tiger in Asia