रतन टाटा अनंतात विलिन, शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

 रतन टाटा अनंतात विलिन, शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी वरळी स्मशानभूमीतील विदयुत दाहिनीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचा लाडका कुत्रा ‘गोवा’ त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सहभागी झाला होता. याशिवाय राजकीय, उद्योग, चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींसह सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
२८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत जन्मलेले रतन टाटा उद्योगांसह सामाजिक क्षेत्रातही काम करत आहेत. रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू आहेत. १९९० ते २०१२ पर्यंत २२ वर्षे ते टाटा समुहाचे अध्यक्ष होते. तसेच ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान, त्यांनी टाटा समूहाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला आहे. रतन टाटा यांनी अनेक वर्षे टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून कामकाज पाहिलं आहे

ML/ML/PGB 10 Oct 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *