Google Map कडून शुल्कात मोठी कपात

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Goggle Map या लोकप्रिय App ची भारतीय बाजारपेठेतील मक्तेदारी आता हळूहळू कमी होत आहे. काही दिवसांपूर्वीच Ola ने Google Map चा वापर थांबवून स्वतःचे App विकसित केले आहेत. त्यानंतर आता Goggle Map ने व्यावसायिक खेळी खेळत भारतीय वापरकर्त्यांसाठी असलेल्या शुल्कात मोठी कपात केली आहे. Goggle Map ने आपल्या सेवेत काही बदल केले आहेत. येत्या 1 ऑगस्टपासून या बदलाची अंमलबजावणी होणार आहे. भारतासाठी हा बदल फायद्याचा ठरणार आहे. गुगल मॅपने आपल्या शुल्कात टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. तसेच गुगल मॅपचे शुल्क आता डॉलरमध्येच भरण्याचा आग्रह राहणार नाही. हे शुल्क आता भारतीय रुपयांमध्ये देता येणार आहे. गुगल मॅपला स्पर्धक तयार झाल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे. गुगलच्या स्पर्धेत ओलाने स्वत:चे मॅप आणले आहे. ओला मॅप मोफत युजर वापरु शकतात.
गुगल मॅपच्या या बदलाचा परिणाम सामान्य युजरवर काहीच होणार नाही. परंतु गुगल मॅप तुम्ही व्यवसायासाठी वापरत असल्यास त्याचा फायदा होणार आहे. व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या गुगल मॅपवर शुल्क द्यावे लागते. आता आधीपेक्षा कमी किंमत त्यासाठी मोजावी लागणार आहे. तसेच गुगल मॅप डॉलरऐवजी भारतीय रुपयांमध्ये पैसे घेणार आहे. गुगल मॅप सामान्य ग्राहकांसाठी फ्री आहे. व्यवसायासाठी वापरताना त्याला शुल्क द्यावे लागते. एखाद्या रायडींग शेअर कंपनीने त्याचा वापर सुरु केला, तेव्हा त्या कंपनीला गुगल मॅपला पैसे द्यावे लागतात. त्या किंमतीत आता बदल करावे लागत आहे.
गुगल नेव्हिगेशनसाठी भारतीय ग्राहकांकडून मासिक शुल्क $4 ते $5 घेत होते. आता 1 ऑगस्ट 2024 पासून ते शुल्क $0.38 ते $1.50 पर्यंत कमी करण्यात आले आहे. तसेच गुगल आपले शुल्क डॉलरऐवजी भारतीय रुपयांमध्ये घेणार आहे.
ML/ML/SL
24 July 2024